सांगली : कारागृहातील कैद्यांना भेटण्यास नातेवाईकांकडे मागितल्याच्या आधारकार्ड कारणावरून चिडलेल्या तिघांनी शासकीय कामात अडथळा आणला. यावेळी महिला पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर दोन महिला धावून गेल्या. याप्रकरणी सचिन माडेकर (वय 45) व महादेवी सचिन माडेकर (40 दोघेही रा. निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक, सध्या रा. चांदणी चौक, इचलकरंजी, ता. हातकणंगले, कोल्हापूर) आणि वाळवा तालुक्यातील करंजवडे येथील एका अल्पवयीन युवतीवर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस कर्मचारी वैशाली जाधवर यांनी फिर्याद दिली. याबाबत माहिती अशी की, सांगली जिल्हा कारागृहातील कैद्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक आले होते. काहींचे पोलिसांच्या निगराणीत एकमेकांशी बोलणे सुरू होते. याचवेळी अनिकेत सचिन माडेकर याचे तीन नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आले होते, यावेळी ही घटना घडली.
