Vehicles collide at Delhi-Meerut Expressway amid dense fog | Watch Video : गेल्या काही महिन्यापासून धुक्याने महाराष्ट्र नाही तर सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली आहे. हायवेवर वाहन चालवणाऱ्या चालकांनाही मोठ्या प्रमाणात धुक्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच सध्या दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवर धुक्यामुळे सुमारे 50 हून अधिक वाहने एकमेकांवर आदळली आहेत.
Video : Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fogसुदैवाने या घडलेल्या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र झालेल्या अपघातामुळे घटनास्थळी बराच वेळ जाम होता. सोशल मीडियावर बऱ्याचदा भारतात नाही तर जगभरात घडलेल्या घटनांचे व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात.अनेकदा घडलेल्या घटना इतक्या विचित्र असतात ती ते पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण होतो.सध्याचा व्हायरल होत असलेला अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेले आहे (Delhi-Meerut expressway in Ghaziabad due to dense fog on Wednesday morning - Delhi Meerut Expressway (DME) and the Eastern Peripheral Expressway (EPE)).
व्हायरल होत असलेली ही घटना दिल्ली मेरठ एक्सप्रेसवरील कलचीना गावाजवळील आहे. जिथे सकाळच्या सुमारास धुक्याच्या समस्येमुळे एका वाहनाने अचानक ब्रेक लावला त्यानंतर एकामागून एक आलेली वाहने एकमेकांना धडकली. तिथे असलेल्या प्रचंड धुक्यामुळे वाहने हटविण्याचे कामात अडथळा निर्माण होत आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल.
व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या पाहता येत असून 'subodh jain 'या एक्स अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला घटनास्थळावरील भीषणता दिसून येईल. ऐवढेच नाही तर विविध देशभरातील यूजर्संनी अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. टीप : अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
![logo top](https://www.belgavkar.com/images/news/pg-logo-top.webp)