Karnataka horror : Police release suspect’s photo in minor sexual harassment case : कर्नाटक—belgavkar—belgaum : उडुपी पोलिसांनी 5 वर्षीय मुलीचा छळ करणाऱ्या आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला असून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. PPC भागात मुलगी नातेवाईकांच्या दुकानाजवळ खेळत असताना एका 30-32 वर्षीय तरुणाने तिला चॉकलेट देण्यासाठी हाताचा इशारा केला. नंतर, त्याने मुलीला दुकानापासून 20 मीटर अंतरावर असलेल्या एका अरुंद गल्लीजवळ नेले आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला.
उडपीचे पोलीस अधीक्षक डॉ अरुण के यांनी सांगितले की, ही घटना 23 जानेवारी रोजी घडली. मात्र, मुलीने ओरडताचं तो पळून गेला. तिचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. महिला पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसपी म्हणाले की परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तपासले गेले आणि असे समजले की तो भीक मागण्यासाठी आला होता आणि कन्नड आणि तुलूमध्ये संभाषण करताना दिसत होता.
पोलिसांनी नियंत्रण कक्ष : 9480805400, महिला पोलिस ठाण्याच्या निरीक्षक : 9480805430 या क्रमांकावर डायल करून लोकांना तो दिसल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, उडुपी जिल्हा प्रभारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, ज्या महिला व बालविकास मंत्री देखील आहेत, यांनी उडुपी येथे एका अज्ञात व्यक्तीकडून पाच वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणावर थेट हाॅस्पिटलमधून त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अपघातामुळे रुग्णालयात दाखल असतानाही मंत्री हेब्बाळकर यांनी तातडीने पोलीस अधीक्षक व उपायुक्तांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, आरोपीला लवकरात लवकर पकडावे आणि मुलीला आवश्यक ती सर्व मदत करावी, अशा सूचना दिल्या.