पुण्यात मागील काही दिवसांपासून जीबीएस अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजारानं थैमान घातलंय (Guillain-Barre Syndrome). दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत चाललीय. आता हा आकडा 73 वर पोहोचला असून, यामुळे पुण्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्र राज्य सरकारनं नागरीकांना तब्येत जपण्याचा सल्ला दिलाय.
आरोग्य विभागाकडून गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांबाबत नवी अपडेट जारी करण्यात आलीय. पुण्यात जीबीएस रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, हा आकडा आता 73 वर पोहोचला आहे. या पैकी 44 रुग्ण हे पुणे ग्रामीण भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. यातील 47 पुरुष तर 26 महिला रुग्ण आहेत. तर, 24 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे.
जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल सर्व्हेलन्स युनिटनं दखल घेतलीय. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक पुण्यात पाठवण्यात आलंय. या 73 रुग्णांपैकी ससून रुग्णालयात 16 रुग्ण, 44 रुग्ण हे पुणे ग्रामीण भागातील आहेत, तर पुणे महापालिका भागातील 11 आणि पिंपरी चिंचवडमधून 15 रुग्णांचा समावेश आहे. तसेच किरकिटवाडीमध्ये 14, तर डीएसके विश्व 8, नांदेड शहर 7 आणि खडकवासलामध्ये 6 रुग्ण आढळले आहेत.
गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा ही कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचं उघड झालंय. दूषित पाणी आणि अन्नातून हा आजार होत असल्याचं समोर आलंय. सुरुवातीला पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि हातापायांना मुंग्या येणे यांसारख्या लक्षणं दिसून येतात. हा सिंड्रोम लहान मुलांमध्ये अधिक वेगानं पसरत आहे. 9 वर्षापर्यंत असलेले 13 रुग्ण तर, 60 ते 69 वयोगटातील 15 रुग्ण आढळल्याची माहिती आहे. हा आजार लहान मुलं आणि वयोवृद्धांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करत आहे. What is Guillain-Barré Syndrome Guillain-Barré syndrome is a rare neurological condition in which the body's immune system attacks part of the peripheral nervous system, according to the World Health Organization. In this syndrome, the nerves controlling muscle movement and those that carry pain, temperature, and touch sensations are affected leading to muscle weakness, loss of sensation in the legs and/or arms, and difficulties in swallowing or breathing. Requires a medical diagnosis Symptoms start as weakness and tingling in the feet and legs that spread to the upper body. Paralysis can occur.