बेळगाव—belgavkar—belgaum : गतवर्षी मे महिन्यात मार्कंडेयनगर, कंग्राळी खुर्द येथील 4 वर्षाच्या बालिकेचा आकस्मिक मृत्यू झाला होता. तेव्हा मुलीच्या आजी-आजोबाने आपल्या नातीचा खून तिच्या सावत्र आईने केल्याचा संशय व्यक्त केला होता. उत्तरीय तपासणी अहवालात ते स्पष्ट झाले असून सावत्र आईवर खुनाचा गुन्हा दाखल करत तिची कारागृहात रवानगी करण्यात आली.
मे 2024 मध्ये एपीएमसी ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या समृद्धी नामक 4 वर्षाच्या बालिकेचा आकस्मिक मृत्यू झाला. एपीएमसी पोलिसांनी त्याची अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद करुन घेतली होती. परंतु, तिच्या आजी-आजोबांनी आपल्या नातीचा खून तिच्या सावत्र आईने केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे, पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन घेतली. त्याचा अहवाल दोन आठवड्यांपूर्वी आला असून यामध्ये तिची सावत्र आई सपना रायण्णा नावीने छळ व मारहाण केल्याने समृद्धीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे,सपनावर खुनाचा गुन्हा दाखल करत तिची हिंडलगा कारागृहात रवानगी केल्याचे एपीएमसीचे निरीक्षक उस्मान आवटी यांनी सांगितले.
समृद्धीच्या आईचे निधन झाल्यानंतर वडील रायण्णा नावी यांनी स्वप्ना ऊर्फ विद्याश्री हिच्याशी विवाह केला. त्यामुळे समृद्धी ही सावत्र आईकडे राहत होती. 20 मे 2024 रोजी समृद्धीचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने आपल्या नातीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची फिर्यादी आजी रेणुका सुनील हंपन्नावर (40 रा. मुतगा) यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात दिली होती.
परकन्नट्टी येथील रायण्णा यांचा विवाह कडोली येथील भारती हंपण्णावर या तरुणीशी 5 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक मुलगीही झाली. मात्र काही वर्षांपूर्वी भारती हंपण्णावर यांचे निधन झाले. याप्रकरणी नागपूरमधील एका पोलिस ठाण्यात तक्रार नोंद आहे. यानंतर रायण्णाने दुसरे लग्न केले. रायण्णा नावी हे सीआरपीएफमध्ये कार्यरत असतात. त्यांची पहिली पत्नी म्हणजे समृद्धीच्या आईचा मृत्यू झाला होता. यानंतर रायण्णा यांनी सपना हिच्याशी दुसरा विवाह केला. नोकरीनिमित्त ते छत्तीसगडमध्ये असल्याने बेळगावात त्यांची दुसरी पत्नी व समृद्धी हे दोघेच राहत होते. या काळात सावत्र आई तिला सातत्याने मारहाण करत होती. या मारहाणीतच समृद्धीचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात स्पष्ट झाले.
या प्रकरणी सपनावर संशय व्यक्त केल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु, तिने जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, मुलीचा मृत्यू तिच्या छळामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आक्षेप घेतल्याने तिला जामीन मंजूर झाला नाही. त्यामुळे तिला अटक झाली. पहिल्या पत्नीच्या पोटी जन्मलेल्या मुलीचे पालनपोषण त्याच्या दुसऱ्या पत्नीने केले. त्यावेळी ते महाराष्ट्रातील नागपूर येथे कार्यरत असले तरी बेळगावातील कंग्राळी के. एच. मध्ये त्यांनी घर बांधले होते. मात्र समृध्दी या मुलीचा आजारपणाने मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताचं तातडीने मुलीच्या मृत आईचे कुटुंबीय कडोलीहून बेळगाव जिल्हा रुग्णालयात आले होते. रायण्णा हंपण्णावर याने पूर्वी माझ्या मुलीची हत्या केली होती, त्याला आता दुसरी पत्नी आहे आणि त्याने माझ्या नातीलाही मारले आहे. समृद्धीची आजी रेणुका यांनी रायण्णा आणि त्याच्या कुटुंबियांना फाशी द्यावी, अशी मागणी केली होती. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.