IND vs ENG : अभिषेक शर्मानं पाहुण्यांना धु धु धुतलं

IND vs ENG : अभिषेक शर्मानं पाहुण्यांना धु धु धुतलं

टीम इंडियानं दिमाखात मारलं ईडन गार्डन्सचं मैदान

IND vs ENG, 1st T20I : Abhishek Sharma equals Yuvraj Singh's record in India's win

डावखुरा अभिषेक शर्मा युवराज सिंगचा चेला

India Vs England 1st T20I Highlights : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघानं 7 गडी अन् 43 चेंडू राखून दक्यात विजय मिळवला आहे. टॉस गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारित 20 षटकात सर्व बाद 132 धावा करत टीम इंडियासमोर 133 धावांचे टार्गेट सेट केले होते.
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
सलामीवीर अभिषेक शर्मानं केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने हा आव्हान सहज पार केले. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  ईडन गार्डन्सच्या मैदानात नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अर्शदीप सिंग याने संघाला कमालीची सुरुवात करून देत पाहुण्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. त्यानंतर वरुण चक्रवर्तीनं पार्टी जॉईन केली. त्याने एकाच षटकात 2 विकेट्स घेत इंग्लंडला आणखी बॅकफूटवर ढकलले. या दोघांशिवाय उप कर्णधार अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या संघाकडून जोस बटलर 44 चेंडूत केलेल्या 68 धावा वगळता अन्य कुणालाही लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. इंग्लंडच्या संघाने निर्धारित 20 षटकात सर्व बाद 132 धावा केल्या होत्या. 
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
अभिषेक शर्माची धमाकेदार बॅटिंग, टीम इंडियाने 13 व्या षटकातच जिंकला सामना : इंग्लंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर 41 धावा असताना संजू सॅमसनच्या रुपात जोफ्रा आर्चरनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्याने 20 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवला जोफ्रा आर्चरनं खातेही उघडू दिले नाही.
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
 त्यानंतर अभिषेक शर्मानं तोऱ्यात बॅटिंग केली. त्याने 34 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकाराच्या मदतीने 232.35 च्या स्ट्राइक रेटनं 79 धावा कुटल्या. त्याने पाहुण्या संघातील गोलंदाजांची केलेल्या धुलाईच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडनं दिलेले आव्हान 13 व्या षटकातील 5 व्या चेंडूवरच पार केले. तिलक वर्मानं 16 चेंडूत नाबाद 19 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्या 4 चेंडूत 3 धावा करून नाबाद राहिला.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
आपल्या खेळीदरम्यान, अभिषेकने त्याचा मार्गदर्शक युवराज सिंगच्या विक्रमाशीही बरोबरी केली, ज्याने त्याच्या कारकिर्दीत दोनदा 20 चेंडूत अर्धशतके ठोकली होती, 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध. अभिषेकचे 20 चेंडूत अर्धशतक हा भारतासाठी संयुक्तपणे तिसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. युवराज आणि अक्षर पटेलसह (2023 मध्ये श्रीलंका विरुद्ध). 2007 च्या टी-20 विश्वचषकात युवराजने केलेल्या 12 चेंडूंच्या शानदार अर्धशतकानंतर, 20 चेंडूंतील हे अर्धशतक भारतासाठी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जलद ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय खेळी आहे.
भारतीय भूमीवर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय फलंदाज
18 चेंडू - सूर्यकुमार यादव - विरुद्ध दक्षिण आफ्रिका - गुवाहाटी - 2022
19 चेंडू - गौतम गंभीर - विरुद्ध श्रीलंका - नागपूर - 2009
20 चेंडू - अभिषेक शर्मा - विरुद्ध इंग्लंड - कोलकाता - 2025
20 चेंडू - युवराज सिंग - विरुद्ध श्रीलंका - मोहाली - 2009
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

IIndia vs England 1st T20I Abhishek Sharma Fifty

Arshdeep Singh Show India won by 7 wkts

India Vs England 1st T20I Highlights

IND vs ENG : अभिषेक शर्मानं पाहुण्यांना धु धु धुतलं
टीम इंडियानं दिमाखात मारलं ईडन गार्डन्सचं मैदान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm