बेळगाव—belgavkar—belgaum : हिंदू धर्मात महाकुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. जगभरात कुंभमेळा लोकप्रिय आहे. दर 12 वर्षांनी भरणारा हा महोत्सव येत्या नवीन वर्षात म्हणजे 2025 मध्ये सुरु आहे, याआधी 2013 मध्ये महाकुंभमेळा झाला होता. धार्मिक मान्यतेनुसार महाकुंभात शाही स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे देश-विदेशातील भाविक या महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सुरु असलेल्या कुंभमेळ्याला उपस्थित राहण्यासाठी नैर्ऋत्य रेल्वेने एक विशेष रेल्वेफेरी सुरू केली आहे. हुबळी-टुंडला-हुबळी व्हाया बेळगाव या मार्गावर 6 फेब्रुवारी रोजी एक्स्प्रेस धावणार आहे. हुबळी येथून 6 रोजी निघालेली एक्स्प्रेस टुंडला येथे 8 फेब्रुवारीला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात 9 रोजी टुंडला (उत्तर प्रदेश @फ़िरोज़ाबाद) येथून निघालेली एक्स्प्रेस 11 रोजी हुबळीला पोहोचेल.
या एक्स्प्रेसला धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर, बेळगाव, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, कुडची, मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, पुणे यासह इतर थांबे देण्यात आले आहेत. प्रवाशांनी या एक्स्प्रेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
The 07379/07380 Hubli-Tundla-Hubli special train will run on January 20th and 23rd, 2024. Train 07379 departs Hubli at 00:45 (Sunday night) on January 20th and arrives in Tundla at 02:30 (Wednesday morning) on January 22nd via Prayagraj. The return train, 07380, leaves Tundla at 16:00 on January 23rd (Thursday) and reaches Hubli at 18:40 on January 25th (Saturday) via Prayagraj. The train consists of 1 AC 2-tier, 4 AC 3-tier, 11 sleeper, 1 generator van, and 1 SLR coach (total 18 LHB coaches). The same train will run again on February 6th and 9th, 2024, as 07381/07382, with the same timings and coach composition. Stops include: Hubli, Dharwad, Alnavar, Londa, Khanapur, Belagavi, Gokak, Ghatprabha, Raibag, Kudachi, Miraj, Satara, Sangli, Kirloskarwadi, Karad, Pune, Daund Chord, Ahmednagar, Kopargaon, Ankai, Manmad, Bhusaval, Khandwa, Itarsi, Pipariya, Narsinghpur, Jabalpur, Katni, Maihar, Satna, Manikpur, Prayagraj Junction, Fatehpur, Govindpuri, Etawah, and Tundla.