बेळगाव शहराचा मास्टरप्लॅन

बेळगाव शहराचा मास्टरप्लॅन

belgavkar.com | belgaum | belgavkar

28 गावांमधील भू-वापर (लँड यूज)

बेळगाव—belgavkar : बेळगाव शहराचा मास्टरप्लॅन तयार करण्याच्या कामाचा ठेका देण्यासाठी अखेर बुडा प्रशासनाने निविदा काढली आहे. बुडाने या कामासाठी 1 कोटी 80 लाखांची निविदा काढली आहे. बेळगाव शहर, बुडा कार्यक्षेत्रातील आधीची 27 गावे व कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ट केलेली 28 गावे यांचा समावेश या मास्टरप्लॅनमध्ये केला जाणार आहे. त्यामुळे यावेळचा बुडाचा मास्टरप्लॅन बेळगावकरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
याआधी बुडाकडून बेळगाव शहराचे दोन मास्टरप्लॅन तयार केले आहेत. 2014 साली मंजूर झालेला मास्टरप्लॅन क्रमांक 2 सध्या अंमलात आहे. या मास्टरप्लॅनमध्ये बेळगाव शहरासह 27 गावांचा समावेश आहे. बुडाने बेळगाव तालुक्यातील 28 गावे नव्याने समाविष्ट केली आहेत. त्याला शासनाकडूनही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता मास्टरप्लॅन क्रमांक 3 तयार करताना या 28 गावांचाही त्यात समावेश केला जाईल. म्हणजे या 28 गावांमधील भू-वापर (लँड यूज) बुडाकडून निश्चित केले जाईल.
मास्टरप्लॅनचा खर्च निश्चित करण्यासाठी बुडाने याआधी निविदा काढली होती. कन्सलटंट कंपनी नियुक्त करून खर्च निश्चित केला होता. त्यानंतर कामाचा ठेका देण्याचा निर्णय 5 ऑगस्टला बुडा बैठकीत घेतला होता. नव्याने समाविष्ट केलेल्या 28 गावांसह नवा मास्टरप्लॅन तयार करण्याचा निर्णय त्याच बैठकीत झाला होता. यासाठी निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर आहे.

belgaum Buda tendered contract for preparing master plan of Belgaum city belgavkar बेळगाव belgaum

belgaum master plan of Belgaum city belgavkar belgaum

Buda master plan of Belgaum

बेळगाव शहराचा मास्टरप्लॅन
28 गावांमधील भू-वापर (लँड यूज)

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm