बेळगाव—belgavkar—belgaum : डोंगराळ भागात 2 मुलींवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अभिषेक, आदिल जमादार आणि चालक कौतुक बडिगेर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
या प्रकरणाबाबत बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, आरोपी अभिषेकची 17 वर्षीय काॅलेज विद्यार्थीनीशी सोशल मिडीया Instagram च्या माध्यमातून ओळख झाली. त्याने मुलीला सांगितले की आपण जत्रेला जात आहोत. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, पीडित मुलीने तिच्या मैत्रिणीला सोबत घेतले आणि दोघेही बसस्थानकाकडे निघाले. तेथे आरोपी अभिषेक पीडित मुलींना कारमधून घेऊन गेला. तिन्ही आरोपी कारमध्ये होते.
पीडित मुलींना रायबाग तालुक्यातील सवसुद्दी गावाजवळील डोंगराळ भागात नेण्यात आले. त्यांनी 3 जानेवारी रोजी दुपारी मुलींवर अत्याचार केला. तक्रार करणाऱ्या मुलीवर त्या दोघांनी तर कार चालकाने गाडीत बसलेल्या तरुणीवर बलात्कार केला. आरोपींनी त्यांच्या मोबाईल फोनवर व्हिडिओ बनवला आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल केले.
पुढे त्यांनी मुलींना गोव्यात येण्यासाठी ब्लॅकमेल केले. पीडित मुलींनी याबाबत घरी माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीने हारुगेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.
