CBI_Officer.jpeg | बेळगाव : 'CBI' ने केले 'या' तीन अधिकार्यांना अटक; लाखो रुपयांच्या लाच प्रकरणी अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : 'CBI' ने केले 'या' तीन अधिकार्यांना अटक; लाखो रुपयांच्या लाच प्रकरणी अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

'त्या' 3 लाचखोर अधिकार्‍यांना न्यायालयीन कोठडी.... 20 लाखातील पहिला हप्ता स्विकारताना रंगेहाथ पकडले

केंद्रीय अन्वेषण विभागाने (Central Bureau of Investigation - CBI - सीबीआय) दोन अधीक्षक आणि एका निरीक्षकाला अटक केली आहे. ते सर्व आयुक्त, केंद्रीय वस्तू व सेवा कर, केंद्रीय उत्पादन शुल्क, बेळगाव (कर्नाटक) (Commissioner, Central Goods & Service Tax, Central Excise) येथे काम करीत आहेत. पाच लाखांच्या लाचखोरी प्रकरणात यांना अटक झाली आहे.
जीएसटी अधीक्षक (बेळगाव), ईन्स्पेक्टर (जीएसटी बेळगाव) व आणखी एकाविरूद्ध केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी तक्रारदाराच्या कारखान्यास भेट दिली आणि आवश्यक जीएसटी (GST) रक्कम न भरल्याबद्दल 20 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून यांना अटक झाली आहे. सुरेश जदगी (Suresh Jadagi, Superintendent of GST, Belgaum), वैभव गौईल (Vaibhav Goel, Inspector, GST, Belgaum) आणि मोहन कुमार (Mohan Kumar, Superintendent of GST Belgaum) यांना अटक झाली आहे. पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयने सापळा रचला आणि निरीक्षकाला पकडले. तपासणी दरम्यान केलेल्या कारवाईत दोन अधीक्षकही पकडले गेले. बेळगाव व गाझियाबाद येथील आरोपींच्या कार्यालयात व निवासी परिसरातील शोध मोहिम काम सुरू आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना आज धारवाड येथील न्यायिक न्यायालयात हजर केले जाईल.
बेळगाव : 'त्या' 3 लाचखोर अधिकार्‍यांना न्यायालयीन कोठडी.... 20 लाखातील पहिला हप्ता स्विकारताना रंगेहाथ पकडले
लाच स्वीकारताना सीबीआयने अटक केलेल्या तीन अधिकार्‍यांना 30 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. दोन अधीक्षक व एका निरीक्षकाचा यामध्ये समावेश आहे. धारवाड येथील विशेष सीबीआय न्यायालयासमोर जीएसटी विभागाचे सुरेश जडगी, मोहनकुमार व वैभव गोयल या तीन अधिकार्‍यांना सीबीआयने हजर केले. जीएसटी कमी करण्यासाठी या अधिकार्‍यांनी 20 लाखांची लाच मागितली होती. 5 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना सीबीआयने त्यांना अटक केली आहे. पानमसाला कंपनीच्या मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून बेंगळूर येथील सीबीआयच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली असून न्यायालयाच्या आदेशावरून अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.