pune-police-tweet-to-aware-while-posting-photo-on-couple-challenge.jpeg | #CoupleChallenge '…तर कपलचं खपल चॅलेंज होईल,'  पोलिसांचं भन्नाट ट्विट | belgaum news | belgavkar बेळगावकर

#CoupleChallenge '…तर कपलचं खपल चॅलेंज होईल,' पोलिसांचं भन्नाट ट्विट

belgavkar.com | belgaum | belgavkar

सोशल मीडियावर सध्या कपल चॅलेंजचा धुमाकूळ

‘पुणे तिथे का उणे’ असं उगाच म्हटलं जात नाही. त्यात पुणेकर म्हटल्यावर का कुठल्या विषयावरून काय टोमणा मारतील याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या कपल चॅलेंजवरून पुणे पोलिसांनी सावधगिरीचा इशारा देत चांगलाच टोमणा हाणला आहे. सोशल मीडियावर नेहमी काही ना काहीतरी ट्रेंड होत असतं. असंच एक #CoupleChallenge ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरु झाला आहे. या ट्रेंडमध्ये प्रेमी युगुल, दांपत्य आपल्या जोडीदारासोबत फोटो शेअर करत आहेत. अनेकजण आपल्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान पुणे पोलिसांनी फोटो पोस्ट करणाऱ्यांना अलर्ट दिला असून फोटो शेअर न करण्याचं आवाहन करणारं भन्नाट ट्विट केलं आहे. पुणे पोलिसांनी ट्विट केलं असून फोटो पोस्ट करणाऱ्यांना असं करण्याआधी दोन वेळा विचार करा असं सांगत जागरुक राहण्यास सांगितलं आहे. कपलचा खपल चँलेंज होईल असा शब्दांत इशाराही दिला आहे.
कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पोलिसांचा पुणेरी टोमणा, पण दिला महत्त्वाचा सल्ला
पुणे पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आपल्या जोडीदारासोबत फोटो पोस्ट करताना दोन वेळा विचार करा. गोड वाटणारं चॅलेंज काळजी नाही घेतली तर चुकीचं होऊ शकतं. पोलिसांनी ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये लिहिलं आहे की, ‘कपल चॅलेंजवाल्यांना सायबर क्रिमिनल चँलेंज न करो, केला तर कपलचा खपल चँलेंज होईल’.

फेक अकाउंट असेल किंवा पोर्न साइटसवर सुद्धा हे फोटो वापरण्यात आलेले आहे. असे अनेक गुन्हे याआधीही घडले आहे.
फोटो पोस्ट करताना काय धोका आहे हेदेखील पोलिसांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. आपण पोस्ट केलेले फोटो मॉर्फिंग, पॉर्न तसंच इतर सायबर क्राइमसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या असं पोलिसांनी म्हटलं आहे. फेसबुकवर सध्या या ना त्या चॅलेंजला जोर आला आहे. त्यातच कपल चॅलेंज या हॅशटॅगने लोकांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर डेटा प्रायव्हसीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. बऱ्याच जणांना आपल्या खासगी आयुष्यातील फोटो शेअर करण्याची भलतीच हौस हसते. हेच साधून सायबर गुन्हेगार त्याचा गैरवापर करतात. याआधीही सोशल मीडियावर मुलींचे फोटो इतर ठिकाणी वापरण्याचे प्रकार समोर आले होते.