matka-sheet.jpg | बेळगाव : मुचंडी येथे मटकाबुकीला अटक; चौकशीत मेन बुकीचे नाव घेतले | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : मुचंडी येथे मटकाबुकीला अटक; चौकशीत मेन बुकीचे नाव घेतले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मुचंडी (ता. बेळगाव) गावातील बस स्थानकाजवळ एका मटकाबुकीला अटक करण्यात आली आहे. महेश यल्लाप्पा यल्लारी (वय 25, रा. नेताजी गल्ली, मुचंडी) असे त्याचे नाव आहे. मारिहाळ पोलिसांनी बुधवारी (23 सप्टेंबर) ही कारवाई केली असून त्याच्यावर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे.
त्याच्या जवळून 2 हजार 10 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या महेशची चौकशी केली असता त्याने आपण शास्ञीनगर येथील मुख्य बुकी विजय शंकर जागृत याच्याकडे चिठ्ठ्या पोहोचवत असल्याची कबुली दिली आहे. महेश मटका चिठ्ठ्या व पैसे मेन मटका बुकी विजयला पुरवत असल्याने बुकी विजयवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.