नॅशनल क्रश साई पल्लवीने बांधली लग्नगाठ?

नॅशनल क्रश साई पल्लवीने बांधली लग्नगाठ?

belgavkar.com | belgaum | belgavkar

फोटो पाहून चाहते म्हणतात, “तिने सिद्ध केलं प्रेमाला..” नीट वाचा पोस्ट

साई पल्लवीने लग्न केल्याची ही चर्चा कशामुळे सुरु झाली आहे याचा आढावा

लाईटहाऊस जर्नालिज्मला एक फोटो सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसले. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीच्या लग्नाचे फोटो म्हणून ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. साई पल्लवी ही अनेकदा तिच्या नो- मेकअप लुकमुळे, भन्नाट डान्स व अभिनयामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांनी या पोस्ट व्हायरल करताना आमचं हार्टब्रेक झालं असंही म्हटलं आहे, खरंच तिने लग्न केलंय का व नेमकी कशामुळे ही चर्चा सुरु झाली आहे या सगळ्याचा आढावा घेऊया..
काय होत आहे व्हायरल?
Sai Pallavi Fandom, एका फेसबुक पेज ने व्हायरल पोस्ट शेअर केले. इतर युजर्सही पोस्ट शेअर करत आहेत.
तपास : आम्ही व्हायरल इमेजवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला. हेच चित्र आम्हाला ottplay.com वरील लेखात सापडले. लेखातील तपशील आणि कॅप्शनद्वारे आम्हाला कळले की अभिनेत्री सई पल्लवीबरोबर दिसत असलेली व्यक्ती राजकुमार पेरियासामी आहे. आम्हाला कळले की राजकुमार पेरियासामी हे दिग्दर्शक असून त्यांचे थुप्पाक्की, SK21 आणि रंगून या चित्रपट चांगलेच गाजले होते. त्यांचे लग्न झाले आहे.
राजकुमार पेरियासामी यांच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मूळ फोटो दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांनी मे महिन्यात साई पल्लवीच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर शेअर केला होता. आम्हाला ख्रिस्तोफर कनागराज यांचे एक ट्विट देखील आढळले ज्याने सांगितले की व्हायरल चित्र SK21 साठी करण्यात आलेल्या पूजेचे आहे. गुगल सर्च वापरून आम्ही साई पल्लवी विवाहित आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला यासंबंधी कोणतीही विश्वासार्ह बातमी आढळली नाही. आम्ही साई पल्लवीचे अधिकृत सोशल मीडिया हँडल देखील तपासले आणि तिच्या लग्नासंबंधी कोणतीही पोस्ट आढळली नाही. दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांनी 29 मे 2018 रोजी चेन्नईच्या श्री वराहम हॉलमध्ये जसविनीशी लग्न केले. लग्नाच्या रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
निष्कर्ष : अभिनेत्री साई पल्लवीने लग्न केलेले नाही. व्हायरल फोटो हा SK21 या चित्रपटासाठी केलेल्या पूजेचा आहे ज्यात दिग्दर्शक राजकुमार पेरियासामीसह साई दिसत आहे.

Did Sai Pallavi get married secretly? Know all about viral wedding Picture

Sai Pallavi Marriage Picture Is Edited | Sai Pallavi Not Married

नॅशनल क्रश साई पल्लवीने बांधली लग्नगाठ?
फोटो पाहून चाहते म्हणतात, “तिने सिद्ध केलं प्रेमाला..” नीट वाचा पोस्ट

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm