विराट कोहलीने आवडत्या गायकाला केले अनफॉलो

विराट कोहलीने आवडत्या गायकाला केले अनफॉलो

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारताविरोधात केली वादग्रस्त पोस्ट

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कॅनेडियन रॅपर शुभला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. खलिस्तान समर्थक शुभने नुकतीच एक वादग्रस्त पोस्ट केली होती. यामध्ये भारताचा नकाशा खंडित दाखवण्यात आला होता. तेव्हापासून रॅपर शुभचा सर्वत्र विरोध होत आहे. IPL 2023 दरम्यान, विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील शुभच्या एलिव्हेटेड गाण्यावर जिममध्ये नाचताना दिसले. कोहली आणि अनुष्काचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांनी त्याला खूप पसंती दिली.
उल्लेखनीय आहे की पंजाबी रॅपरवर अलीकडेच खलिस्तानी फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर शुभने इंस्टाग्रामवर एक वादग्रस्त पोस्ट टाकून वादाला खतपाणी घातले. यामुळे भारतीय जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. शुभचा मुंबईतील शो रद्द करण्यात आला आहे. विराट कोहली रॅपर शुभला इंस्टाग्रामवर फॉलो करत असे. विराट कोहलीने शुभची प्रशंसा करत त्याला आपला आवडता गायक म्हटले होते. याबद्दल शुभने विराट कोहलीचे आभारही मानले होते, मात्र वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर कोहलीने शुभला अनफॉलो केले.
नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात शतक झळकावले. तसेच तो सर्वात जलद 13 हजार धावा करणारा फलंदाज ठरला. यासोबतच त्याने वनडे कारकिर्दीतील 47 वे शतक झळकावले.

Virat unfollows his favourite singer Shubh for sharing controversial post

Why is Canada based singer Shubh facing backlash? Virat Kohli unfollows him boAt withdraws support

विराट कोहलीने आवडत्या गायकाला केले अनफॉलो
भारताविरोधात केली वादग्रस्त पोस्ट

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm