बेळगाव : बेळगावात रोप वे योजना अंमलबजावणी कामास मंजुरी मिळाली आहे. याबाबत आमदार अभय पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात रोप-वे योजनेसाठी 60 कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती निवेदनाद्वारे केली त्याला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संमती दिली. तसेच खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करून अहवाल देण्याची सूचना केली आहे.
belgavkar
येत्या डिसेंबरच्या आत अहवाल घेऊन आवश्यक अनुदान मंजूर करण्याचे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले. पुढील वर्षी जानेवारीनंतर रोप-वे योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्याचे आमदार पाटील यांनी कळविले आहे. योजनेअंतर्गत येळ्ळूरपासून राजहंसगडापर्यंत रोप-वे जोडण्यात येणार आहे. याशिवाय शेजारील महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पर्यटन प्रेमी नागरिकांनाही रोप वे प्रमुख आकर्षण ठरणार आहे, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.