करून दाखवलं...! अभिनेत्याची 100 कुटुंबांना कोट्यवधींची मदत

करून दाखवलं...!
अभिनेत्याची 100 कुटुंबांना कोट्यवधींची मदत

belgavkar.com | belgaum | belgavkar

चित्रपटाचे यश फॅन्ससोबत साजरे

अभिनेता विजय देवरकोंडाने 'Kushi' चित्रपटाचे यश त्याच्या फॅन्ससोबत साजरे केले आहे. Actor Vijay Deverakonda याने सांगितल्याप्रमाणे 100 कुटुंबांना एक-एक लाख रुपयांचा चेक दिला आहे. हैद्राबादला आयोजित या कार्यक्रमाला विजय देवरकोंडा, चित्रपटाचे दिग्दर्शक शिव निर्वाण, निर्माते नवीन येरनेनी उपस्थित होते.
चित्रपटाचे निर्माते नवीन येरनेनी यांनी या वेळी सांगितले की, 'आमच्या खुशी या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. तसेच चित्रपट सुपरहिट देखील ठरला आहे. या यशासाठी आम्ही प्रेक्षक आणि फॅन्सचे आभार मानतो. मला आनंद आहे की विजयने 100 लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि ही मोहीम आमच्या चित्रपटापासून सुरू झाली. विजयने उचलेल्या या पावले सगळ्यांना प्रेरणा मिळेल.'
विजय देवरकोंडाच्या या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत समंथा रूथ प्रभू देखील होती. या दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विजय देवरकोंडाने 100 गरजूंना 1-1 लाखाची मदत करणार असे सांगितले होते. विजयने त्याचा दिलेला शब्द पळाला. चित्रपटाच्या यशानंतर त्याने गरजूंना मदत केली आहे. विजय देवरकोंडाने यावेळी म्हटले की, 'प्रेक्षक माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्यासाठी मला अनेक चांगले उपक्रम राबवायचे आहेत. कारण मलाही एकदा वाटले होते की, आम्हाला कोणी अशी मदत केली तर किती चांगले होईल. जेव्हा मी शिकत होतो तेव्हा माझे सर्व मित्र सुट्टीत फिरायला जायचे, मी घरीच राहायचो कारण मला पैसे मागून माझ्या आईवडिलांना त्रास द्यायचा नव्हता. मग माझे मित्र सुट्ट्या कशा एन्जॉय करत असतील असा प्रश्न मला पडायचा.
आम्ही माझ्या भावाच्या इंजिनियर फीसाठी धडपडत करत होतो, तेव्हा माझ्या डोळ्यात आलं की गरजूंना कोणी का मदत करत नाही. मी सर्व अडचणींवर मात करून मी हा प्रवास पूर्ण केला आहे. आज तुम्हाला मदत करता यावी ही माझी स्वतःची इच्छा आहे. हे एक लाख रुपये मिळाल्यानंतर जर तुम्हाला थोडा आनंद मिळाला आणि तणाव कमी झाला तर मला समाधान मिळेल. ही छोटीशी मदत जर तुमच्या कमी आली तर मला आनंद होईल. मी माझे प्रेम तुमच्यासोबत शेअर करत आहे.
गेल्या वेळी काही तरुणांना पिकनिकला पाठवले होते. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 50 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. आम्ही फक्त 100 लोकांना हे पैसे देऊ शकतो. दरवर्षी मी वेगवगेळ्या लोकांना मदत करतो. जोपर्यंत मी खंबीर आहे, जोपर्यंत मी चित्रपट करत राहीन, तोपर्यंत मी तुम्हाला साथ देत राहीन. तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.

Vijay Deverakonda stand by his words; Donates one lakh to 100 families

Vijay Deverakonda Donates ₹1 Crore To 100 Families After Kushi Success

करून दाखवलं...! अभिनेत्याची 100 कुटुंबांना कोट्यवधींची मदत
चित्रपटाचे यश फॅन्ससोबत साजरे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm