बेळगाव : कर्नाटकात मोफत बस प्रवासासाठी महिलांना आधार कार्ड अनिवार्य

बेळगाव : कर्नाटकात मोफत बस प्रवासासाठी महिलांना आधार कार्ड अनिवार्य

belgavkar.com | belgaum | belgavkar

महिलांना शक्ती स्मार्ट कार्ड देण्यात येणार

कर्नाटकाच्या हद्दीपुरताच महिलांना बस प्रवास मोफत

बेळगाव : काँग्रेसने सत्तेवर येताच जारी केलेल्या पाच हमी योजनांपैकी तातडीने लागू होणार्‍या महिलांना मोफत बस प्रवास योजनेची मार्गसूची जाहीर करण्यात आली. रविवार 11 जूनपासून ही योजना लागू होत असून, येत्या तीन महिन्यांत महिलांना शक्ती स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांना सेवा सिंधू केंद्रात अर्ज करावा लागणार आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करण्यासाठी महिलांंना शक्ती स्मार्ट कार्ड सोबत ठेवावे लागेल. हे कार्ड नसल्यास महिलांना मोफत प्रवास करता येणार नाही. या कार्डवर संबंधित महिलेचे छायाचित्र असणार आहे. स्मार्ट कार्ड तयार होईपर्यंत आधार कार्ड दाखवून प्रवास करता येईल. आधार कार्डवर कर्नाटक राज्यातील पत्ता हवा. महिला प्रवाशाने आधार कार्ड दाखवले पाहिजे आणि वाहकाने प्रवाशाला ‘शून्य’ भाडे असलेले तिकीट दिलेे पाहिजे, असे केएसआरटीसीचे विभागीय नियंत्रक सिद्धेश्वर हेब्बाळ यांनी सांगितले.
केएसआरटीसी मुख्यालयाला अद्याप शक्ती योजनेची माहिती मिळणे बाकी आहे. एखादी महिला आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही राज्यातील असली तरी तिने तिचा पत्ता कर्नाटकातील असेल तर किंवा यानंतरही केला तरी तिलाही मोफत प्रवास करत येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. केवळ कर्नाटकाच्या हद्दीपुरताच महिलांना बस प्रवास मोफत असेल. आंतरराज्य बसमध्ये तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. त्याशिवाय आराम बस, राजहंस बस, वातानुकूलित यंत्रणा असलेल्या बस, स्लीपर बस, ऐरावत गोल्ड क्लास, अंबारी विशेष बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करता येणार नाही.

free bus travel scheme for women launched in karnataka belgaum

Karnataka issues orders on free bus rides for women scheme

Free bus travel for women : Powerful mechanism for empowerment

बेळगाव : कर्नाटकात मोफत बस प्रवासासाठी महिलांना आधार कार्ड अनिवार्य
महिलांना शक्ती स्मार्ट कार्ड देण्यात येणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm