कुत्र्याची छत्री आहे आलं अन् तुळशी पेक्षा गुणकारी. शास्त्रज्ञांनी शोधले मशरूमचे औषधी गुण

कुत्र्याची छत्री आहे आलं अन् तुळशी पेक्षा गुणकारी. शास्त्रज्ञांनी शोधले मशरूमचे औषधी गुण

belgavkar.com | belgaum | belgavkar

ढींगरी मशरुम उगवण्याचा यशस्वी प्रयोग

आता मशरुम खाल्ल्याने फक्त प्रोटीन्सच नाही तर आले आणि तुळशीचेही औषधी गुण मिळतील. ढींगरी मशरूम वर करण्यात आलेल्या प्रयोगानंतर त्याची गुणवत्ता तपासण्यात आली. सोलन (हिमाचल प्रदेश) येथील मशरूम संचालनालयातल्या शास्त्रज्ञांनी आले आणि तुळशीच्या अवशेषांवर ढींगरी मशरूमची लागवड केली होती. त्यानंतर यात किती औषधी गुण आलेत याची गुणवत्ता तपासली जात होती. आता याच्या पुढील तपासणीसाठी पंजाबच्या आधुनिक लॅबमध्ये पाठवले जात आहे. त्यातून यात कशाचे किती औषधी गुण आले आहेत हे कळू शकेल. प्रयोगात यश मिळाल्याने आता ढींगरी मशरूम खाल्ल्याने बऱ्याच आजारांमध्ये लाभ होऊ शकेल. हे ढींगरी मशरूम खाल्ल्याने हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहील. रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. शिवाय पचनशक्तीही सुधारेल, शिवाय या मशरुममध्ये एवढे औषधी गुण येतील की, त्यामुळे अनेक आजारांवर ईलाज होईल असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खुंब अनुसंधान संचालनालयच्या शास्त्रज्ञांनी औषधी रोपांच्या भागांवर ढींगरी मशरुम उगवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. यातून तयार मशरुमचे निरीक्षण आणि गुणवत्ता तपासली जात आहे. यानंतर डीएमआप गवती चहा, हळदीवरही प्रयोग करत आहेत. यात यश मिळाले तर मशरुम फक्त उत्तम पदार्थच न राहता नैसर्गिक औषषधी गुणांनी युक्त होईल. हा प्रयोग डीएमआर सोलनचे शास्त्रज्ञ डॉ. बृज लाल अत्री आणि डॉ. अनुराधा करत आहेत.
देशात ढींगरी मशरूम गव्हाच्या पेंढा, उसाचा बगॅस आणि पेंढा यावरही तयार केला जात आहे. औषधी वनस्पतींवर मशरूम तयार करण्यासाठी मशरूम संचालनालयातर्फे प्रथमच संशोधन करण्यात येत आहे. मशरूमच्या चवीसह ते औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असेल असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

dhingri mushroom research ginger and tulsi benefits will also get from mushroom

Mushroom Research Ginger And Tulsi Benefits Will Also Get From Mushroom

कुत्र्याची छत्री आहे आलं अन् तुळशी पेक्षा गुणकारी. शास्त्रज्ञांनी शोधले मशरूमचे औषधी गुण
ढींगरी मशरुम उगवण्याचा यशस्वी प्रयोग

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm