मोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती

मोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती

belgavkar.com | belgaum | belgavkar

मेहरबानला पोलिसांनी केली अटक

मोहन असं नाव सांगून हिंदू मुलीची फसवणूक करणाऱ्या आणि तिचं धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर सक्ती करणाऱ्या मेहरबान नावाच्या मुस्लिम तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद रेल्वे स्टेशनवरुन मेहरबान हुसैनला अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मेहरबानने त्याचं आधारकार्डही मोहन नावाने तयार केलं होतं.
काय आहे प्रकरण?
मुरादाबादमधल्या रामपूरच्या भोट गावात एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने त्याचं नाव मोहन असल्याचं सांगितलं. आपण हिंदू आहोत हे तिला भासवलं त्यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.
जेव्हा या महिलेला समजलं की मोहनचं खरं नाव मेहरबान आहे तेव्हा तिने त्याच्याशी असलेले संबंध संपुष्टात आणले. मात्र मेहरबानने तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली. मेहरबान हुसैन हा महिलेला कलियर शरीफ या ठिकाणी घेऊन चालला होता त्याचवेळी या मेहरबानला अटक करण्यात आली. भोट गावात राहणारा एक तरुण ज्याने हिंदू महिलेला स्वतःचं नाव मोहन आहे असं सांगितलं होतं. त्याचं नाव मेहरबान आहे. तो या हिंदू महिलेचा पाठलाग करत होता. जेव्हा या महिलेला समजलं की मोहनचं खरं नाव मेहरबान आहे आणि तो मुस्लिम आहे तेव्हा तिने दोघांमध्ये असलेले संबंध संपुष्टात आणले. त्यानंतर मेहरबानने या महिलेला धर्मांतर करण्यासाठी धमकावलं. या मुलाने मोहन नाव असलेलं आधारकार्डही बनवून घेतलं होतं. आम्ही या मेहरबानला अटक केली आहे. रामपूर पोलीस ठाण्याचे अँडिशनल एसपीडीआर संसार सिंह यांनी ANI ला ही माहिती दिली आहे.
मुरादाबाद स्टेशनवरुन मेहरबानला अटक करण्यात आली. या ठिकाणी एक हिंदू महिला मुस्लिम तरुणासह ट्रेनची वाट बघत होती. त्यावेळी तिथून जाणाऱ्या RSS च्या महिलेची नजर स्टेशनच्या बेंचवर बसलेल्या महिलेच्या हातावर गेली. तिच्या हातावर ओम गोंदवलेला होता. त्यानंतर तरुणाशी RSS च्या महिलेने संवाद साधला ज्यावरुन तो मुस्लिम असल्याचा संशय तिला आला. सुरुवातीला त्याने मोहन नाव असल्याचं या संघाच्या महिलेला मेहरबानने सांगितलं. मात्र त्याला फोन आला तेव्हा त्याने आपण मेहरबान बोलत असल्याचं सांगितलं. काहीतरी गडबड आहे हे या महिलेच्या लक्षात आलं. या महिलेने पोलिसांना संपर्क केला आणि सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर मोहन उर्फ मेहरबान हुसैनला तातडीने अटक करण्यात आली. मेहरबान हुसैनच्या विरोधात भोट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

Posing As Mohan Meherbaan Was Taking The Woman To Kaliyar Sharif Rss Woman Officer

uttar pradesh meharban se mohan bankar ladki ko phansaya accused arrest

मोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती
मेहरबानला पोलिसांनी केली अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm