कर्नाटकात क्रूझर-लॉरीचा भीषण अपघात, 5 ठार, 13 गंभीर जखमी

कर्नाटकात क्रूझर-लॉरीचा भीषण अपघात, 5 ठार, 13 गंभीर जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

दर्ग्याच्या उरुससाठी जात होते

कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर बालीचक्र गावाजवळ उभ्या असलेल्या एका लॉरी ट्रकला क्रूझरने धडक दिली. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आणि 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुनीर (वय 40), नयामत (40), मुद्दसीर (12), रमिझा बेगम (50), सुम्मी (12) अशी मृतांची नावे आहे. हे सर्व जवळचे नातेवाईक आहेत. मुद्दसीर हा मुनीर यांचा मुलगा आहे. हे आंध्र प्रदेशातील बांदी आत्मकूरु गावातील रहिवाशी आहेत. तर वेलुगोडू गावातील तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. क्रूझर गाडीतील सर्वजण आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्ह्यातून कलबुर्गी येथील ख्वाजा बंदेनवाजा दर्ग्याच्या उरुससाठी जात होते.
दरम्यान, क्रूझर गाडी बालीचक्रजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला धडकली. या अपघातात एक मुलगा आणि मुलगीसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 13 जण जखमी झाले असून त्यांना यादगिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील दाखल केलेल्या 5 जणांची प्रकृतीही गंभीर आहे.

five persons died and 13 were seriously injured in accident at yadgiri district karnataka

accident 5 dead 13 injured in yadgir

कर्नाटकात क्रूझर-लॉरीचा भीषण अपघात, 5 ठार, 13 गंभीर जखमी
दर्ग्याच्या उरुससाठी जात होते

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm