HoD च्या केबिनमध्ये घडलेल्या घटनेनं कोलमडली; इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीनं घेतला जगाचा निरोप

HoD च्या केबिनमध्ये घडलेल्या घटनेनं कोलमडली;
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीनं घेतला जगाचा निरोप

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्रद्धानं टोकाचं पाऊल उचललं

कोट्टायम : केरळच्या कोट्टायममध्ये विद्यार्थिनीनं जीवनप्रवास संपवला आहे. श्रद्धा असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. अमल ज्योती इंजिनीयरिंग कॉलेज हॉस्टेलमध्ये तिनं आत्महत्ये केली. फूड टेक्नॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षात ती शिक्षण घेत होती. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. इर्नाकुलमच्या त्रिपुनिथुरामधील थिरुवनकुलम गावची रहिवासी असलेली श्रद्धा हॉस्टेलच्या रुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. कॉलेजमधील अधिकाऱ्यांनी मोबाईल जप्त केल्यामुळे श्रद्धानं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. शिक्षकांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून श्रद्धानं टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी तिला रुग्णालयात नेण्यासही मुद्दाम उशीर केला, असा दावा कुटुंबियांनी केला.
'अमल ज्योती इंजिनीयरिंग कॉलेजच्या विभागाचे प्रमुख तिचा मोबाईल जप्त केल्यानंतर तिच्याशी बोलले. त्यांनी तिचा छळ केला. एचओडींची (HoD) केबिन सोडताना तिचा मानसिक तोल ढासळला होता. तिच्या मित्रमैत्रिणींनी आम्हाला याबद्दल सांगितलं,' असं श्रद्धाचे वडील म्हणाले. श्रद्धाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं डॉक्टरांना सांगितलं असतं तर तिच्यावर त्या पद्धतीनं उपचार झाले असते. मात्र कॉलेज प्रशासनानं तिला चक्कर आल्याचा दावा केला, असं श्रद्धाच्या नातेवाईकांनी सांगितलं.
कॉलेजच्या ग्रंथालयात मोबाईल वापरल्यानं कॉलेज प्रशासनानं तिला दटावलं होतं. त्यांनी तिच्याकडून मोबाईल काढून घेतला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना कॉलेजला बोलावलं. घडलेला प्रकार त्यांच्या कानांवर घालण्यात आला. तुमच्या मुलीला सेमिस्टरमध्ये खूप कमी गुण मिळाले आहेत, असंदेखील प्रशासनाकडून कुटुंबियांना सांगण्यात आलं. यामुळे श्रद्धा नाराज होती.

kerala student found hanging at engineering college hostel after officials seize her mobile phone

kerala student found hanging at engineering college hostel

HoD च्या केबिनमध्ये घडलेल्या घटनेनं कोलमडली; इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीनं घेतला जगाचा निरोप
श्रद्धानं टोकाचं पाऊल उचललं

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm