बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे विजयोत्सव साजरा

बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे विजयोत्सव साजरा

belgavkar.com | belgaum | belgavkar

हॉकी स्पर्धेत सर्वाधिक 4 वेळा जिंकण्याचा पराक्रम

बेळगाव : आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सर्वाधिक 4 वेळा जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला. त्याचबरोबर मलेशियात होणाऱ्या ज्युनियर विश्वकरंडक हॉकी स्पर्धेसाठी पात्रताही मिळवली. या शानदार यशाचे कौतुक हॉकी बेळगावतर्फे करण्यात आले. हॉकी बेळगावतर्फे विजयोत्सव धर्मवीर संभाजी चौकात मिठाई व फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. मिठाई व फटाके हॉकी बेळगांवचे सदस्य माजी महापौर संजय शिंदे व सुरेश पोटे यांनी पुरस्कृत केले होते.
प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी विजयोत्सवाची माहिती दिली तर सचीव सुधाकर चाळके यांनी आँलिंपिकवीर बंडू पाटील यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण केला. हॉकीपटू मुला-मुलींनी उपस्थितांना मिठाईचे वाटप केले. यावेळी उपाध्यक्ष पूजा जाधव, विनोद पाटील, मनोहर पाटील, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, विकास कलघटगी, गणपत गावडे, उत्तम शिंदे, शिवाजी जाधव, आदी उपस्थित होते.

Junior Mens Asia Cup Hockey : India beat Pakistan 2 1 in final to clinch fourth title junior asia cup award for players

women s junior asia cup hockey india register victory over malaysia

India beat Pakistan to win Junior Mens Asia Cup Hockey belgaum belgavkar belgaum

बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे विजयोत्सव साजरा
हॉकी स्पर्धेत सर्वाधिक 4 वेळा जिंकण्याचा पराक्रम

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm