viral-video-door-of-asiana-airlines-plane-opens-mid-air-opening-emergency-door-of-flight-in-south-korea-202305.jpeg | Video Viral : लँड व्हायच्या आधी हवेतच उघडले विमानाचे दरवाजे; थरकाप उडवणारा व्हिडिओ | belgaum news | belgavkar बेळगावकर

Video Viral : लँड व्हायच्या आधी हवेतच उघडले विमानाचे दरवाजे;
थरकाप उडवणारा व्हिडिओ

belgavkar.com | belgaum | belgavkar

आकाशातच उघडला विमानाचा दरवाजा;
9 जण गुदमरले, धक्कादायक Video पाहून येईल अंगावर काटा


लँडिंगच्या अगदी काहीच क्षण आधी एका प्रवाशाने एशियना एअरलाइन्सच्या विमानाची आपत्कालीन एक्झिट उघडल्याचा प्रकार घडला. हवेतच असताना आकाशात विमानाचा दरवाजा उघडल्याने काही प्रवासी गुदमरून गेल्याचे वृत्त समोर येत आहे. दक्षिण कोरियाच्या योनहाप न्यूज एजन्सीने 9 जणांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त दिले आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या फुटेजमध्ये विमानात हवेत उघड्या दारातून वारा वाहताना दिसत आहे, ज्यामध्ये फॅब्रिक सीट-बॅक आणि प्रवाशांचे केस वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने फडफडताना दिसत आहेत व प्रवासी गोंधळून आरडाओरडा करत आहेत. अचानक दरवाजा उघडल्यामुळे अनेकांचा श्वास गुदमरला.
प्राप्त माहितीनुसार, एअरबस A321-200 हे जवळपास 200 प्रवाशांना घेऊन जात होते. डेगू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीजवळ जेव्हा विमान जमिनीपासून सुमारे 200 मीटर (650 फूट) वर होते तेव्हा सदर प्रकार घडला. टाइम्सच्या माहितीनुसार, आपत्कालीन एक्झिटजवळ बसलेल्या एका प्रवाशाने लीव्हरला स्पर्श करून हाताने दरवाजा उघडला. दरम्यान, या प्रवाशाला पोलिसांकडे नेण्यात आले आहे आणि त्यांनी दार का उघडले यासंदर्भात चौकशी सुरू आहे असे एशियना एअरलाईन्सने सांगितले.