आता उत्तराखंडवर चीनचा डोळा...! LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे वसवण्याची योजना

आता उत्तराखंडवर चीनचा डोळा...!
LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे वसवण्याची योजना

belgavkar.com | belgaum | belgavkar

ही गावे डिफेन्स व्हिलेज म्हणून ओळखली जातील

चिनी आर्मी म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मी लक्ष ठेवणार

चीन नेहमी भारताविरोधात काहीतरी कुरापती करताना दिसून येतो. अनेक दशकांपासून चीन केवळ अरुणाचल प्रदेशकडेच नाही तर आता उत्तराखंडकडेही लक्ष देत आहे. चीन उत्तराखंड सीमेला लागून असलेल्या भागात गावे वसवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही गावे डिफेन्स व्हिलेज म्हणून ओळखली जातील, ज्यावर चिनी आर्मी म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मी लक्ष ठेवणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक गावात 250 घरे असतील. मोठी गोष्ट म्हणजे ही सीमावर्ती गावे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) केवळ 11 किलोमीटर अंतरावर बांधली जात आहेत. याशिवाय, चीन एलएसीपासून 35 किमी अंतरावर 55-56 घरे असलेली गावेही वसवली जात आहेत.
पीपल्स लिबरेशन आर्मीही त्यांच्यावर देखरेख करेल. ही सर्व गावे चीनच्या सीमेला लागून असलेल्या पूर्वेकडील सेक्टरमधील 400 गावे वसवण्याच्या योजनेचा भाग आहेत. दरम्यान, उत्तराखंड या पहाडी राज्याची चीनशी 350 किलोमीटरची सीमा आहे. मात्र, बहुतांश सीमावर्ती भागात उपजीविकेची तीव्र कमतरता असून, त्यामुळे येथे स्थलांतर होत आहे. याआधी बातम्या आल्या होत्या की, चीन उत्तराखंडमधील नीती पासजवळ नवीन कॅम्प उभारत आहे. दुसरीकडे, चीनच्या या नव्या चालीबाबत भारतीय लष्कर अधिकच सावध झाले आहे. भारतीय लष्कर आधीच एलएसीवरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

china building border defence villages 11 km rom lac in uttarakhand

China building border defence villages 11 km from LAC in Uttarakhand

China villages 11 kms from LAC in Uttarakhand

आता उत्तराखंडवर चीनचा डोळा...! LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे वसवण्याची योजना
ही गावे डिफेन्स व्हिलेज म्हणून ओळखली जातील

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm