first-look-of-new-parliament-building-watch-video-202305.jpeg | New Parliament Building Video | belgaum news | belgavkar बेळगावकर

New Parliament Building Video

belgavkar.com | belgaum | belgavkar

वाद उदंड झाले, पण ही नवी संसद दिसते कशी?
पाहा लोकसभा-राज्यसभेचा खास व्हिडिओ


नवी दिल्ली : देशाच्या नवीन संसद भवन इमारतीचे येत्या 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. या नवीन संसद भवनाची इमारत आतून कशी दिसते याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. यादरम्यान आता संसद भवन इमारतीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संसद इमारतीच्या आतील तसेच बाहेर भाग देखील दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राजसभा आणि लोकसभा सभागृह सर्व कोनातून दाखवण्यात आलेत. हा व्हिडीओ पाहाताना तुम्हाला संसदेत गेल्याचा अनुभव येतो.


महत्वाचे म्हणजे 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन संसद भवनाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली होती. संसद भवनाच्या नवीन संकुलाच्या बांधकामासाठी 861 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता पण नंतर तो 1200 कोटी रुपये इतका झाला. दरम्यान या न संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उदघाटनाबाबतही बरेच राजकारण होत आहे. 28 मे रोजी या इमारतीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशातील अनेक विरोधी पक्ष हे नवीन संसद भवन संकुलाचे उदघाटन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी करावे अशी मागणी करत आहेत.
यामुळेच काँग्रेस आणि इतर 20 विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या नवीन संकुलाच्या उदघाटन कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यांच्याकडून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. भाजप राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना उदघाटनाची संधी न देऊन त्यांच्या पदाचा अपमान करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.