बेळगाव : बेळगाव शहरातील काही उपनगरांसह बेळगाव तालुक्याच्या काही भागातील वीजपुरवठा दोन दिवस बंद

belgavkar.com | belgaum | belgavkar

वीज उपकेंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेणार


बेळगाव : हेस्कॉम 33 केव्ही व 110 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने शनिवारी (27) व रविवारी (28) बेळगाव शहरातील काही उपनगरांसह बेळगाव तालुक्याच्या काही भागातील वीजपुरवठा सकाळी 10 ते सायंकाळी 5 या काळात खंडित केला जाणार आहे. शनिवारी व रविवारी खानापूर रोड, उद्यमबाग औद्योगिक वसाहत, गुरुप्रसाद कॉलनी, राणी चन्नमानगर, तिसरे रेल्वे फाटक, वसंत विहार, सुभाषचंद्र कॉलनी, उत्सव हॉटेल, जीआयटी कॉलेज, देवेंद्रनगर, महादेवनगर, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी, जैतनमाळ या भागात सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेतवीजपुरवठा खंडीत केला जाईल.
तर शनिवारी बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, येळेबैल, राकसकोप, कुद्रेमानी, कल्हेहोळ, बेळगुंदी औद्योगिक वसाहत, उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे, सुळगा, तुरमुरी, कोनेवाडी, बाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, अंगडी कॉलेज, गणेशपूर, महालक्ष्मीनगर, आर्मी कॉलनी, केएचबी लेआऊट या भागात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज नसेल. ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.