shiv-jayanti-chitrarath-procession-in-vadgaon-area-tradition-belgaum-बेळगाव-belgavkar-belgaum-202305.jpg | बेळगाव : आज वडगावात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : आज वडगावात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहराची शनिवारी चित्ररथ मिरवणूक


बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक परंपरेनुसार वडगाव परिसरात शुक्रवारी (26 मे) संध्याकाळी निघणार आहे. त्यासाठी विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी तयारी केली आहे. वडगाव परिसरात शहराच्या एक दिवस आधी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. यंदा बेळगाव शहराची शनिवारी (दि. 27) चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे शुक्रवारी वडगाव परिसरातील चित्ररथ मिरवणूक निघणार आहे.
या मिरवणुकीत 9 चित्ररथ सहभागी होणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार असून मिरवणुकीसाठी मंडळाच्या कार्यकत्यांनी विविध सजिव देखाव्यांची तयारी केली आहे. पारंपरीक मर्‍हाटमोळ्या वातावरणात ही मिरवणूक निघणार आहे.