karnataka-govt-may-withdraw-circular-banning-hijab-warns-of-rss-ban-202305.jpeg | बेळगाव : कर्नाटकातील हिजाबबंदी मागे घेण्याचा सरकारचा गांभीर्याने विचार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : कर्नाटकातील हिजाबबंदी मागे घेण्याचा सरकारचा गांभीर्याने विचार

belgavkar.com | belgaum | belgavkar

शाळा व महाविद्यालयांत हिजाबवर बंदी घालणारा आदेश


बेळगाव : कर्नाटकातील शाळा व महाविद्यालयांत हिजाबवर बंदी घालणारा आधीच्या भाजप सरकारचा आदेश मागे घेण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत आहे. मंत्री प्रियांक खर्गे यांनी हे संकेत दिले असून, राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास संघ व बजरंग दलावरही बंदी घालण्याचा विचार केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. बंगळुरात पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले की, संघ असो की बजरंग दल किंवा आणखी कोणतीही संघटना, जे लोक कायदा मोडतील, राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल; मग ती बंदीही असू शकते.
गेल्या चार वर्षात समाजात काही घटक कायद्याची भीती न बाळगता, पोलिसांची भीती न बाळगता वावरत होते. भाजपच्या नेत्यांना हे मान्य नसेल, तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे, असा टोलाही त्यांनी लगावला. हिजाबच्या विषयावर खर्गे म्हणाले की, भाजप सरकारने त्यांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचा आम्ही फेरविचार करणार आहोत. हिजाबबंदीचा आदेश, पाठ्यपुस्तकांमधील बदल, गोहत्याबंदी आणि धर्मातरविरोधी कायदे यांचाही आम्ही आढावा घेणार आहोत, असे ते म्हणाले.