fighting-between-two-families-due-to-a-land-dispute-happened-in-bhavihal-village-bailakhongal-taluka-belgaum-बेळगाव-belgavkar-belgaum-202305.jpg | बेळगाव : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील भावीहाळ गावात गुरुवारी उघडकीस आली. एकमेकांना लाठीने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महारुद्रप्पा कुंभार आणि शंकरप्पा कुंभार कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून जमिनीचा वाद सुरु आहे. त्यामुळे, शंकरप्पा कुंभार न्यायालयात गेले होते.
त्यानंतर आता शेतातील सागवान झाडे तोडल्यावरून भांडण झाले. त्यानंतर झालेल्या हाणामारीत चारजण जखमी झाले आहेत. बैलहोंगल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.