संसद भवनाच्या उदघाटनाला उपस्थित राहणार

संसद भवनाच्या उदघाटनाला उपस्थित राहणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

ही इमारत भाजपा किंवा आरएसएसचे…, एच. डी. देवगौडा यांची प्रतिक्रिया

राष्ट्रपतींना निमंत्रण न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या उपस्थितीत नव्या संसद भवनाचे उदघाटन होत आहे. त्याचा निषेध करत या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे या सोहळ्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (धर्मनिरपेक्षक) सर्वेसर्वा एच. डी. देवगौडा (JDS) यांनी यावर भाष्य केलं आहे. “नवीन संसद भवनच्या सोहळ्याचा उपस्थित राहणार आहे. तसेच, ही इमारत भाजपा अथवा आरएसएसचे कार्यालय नाही,” अशा शब्दांत एच. डी. देवगौडा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“नवीन संसद भवनाच्या उदघाटन सोहळ्याला मी उपस्थित राहणार आहे. ही भव्य इमारत देशातील जनतेच्या करातून बांधण्यात आली आहे. ती देशाची आहे. ही इमारत भाजपा किंवा आरएसएसचे कार्यालय नाही,” असं एच. डी देवगौडा यांनी म्हटलं आहे. 'I will be attending the inauguration of the new building of Parliament House. That magnificent building was built with the tax money of the people of the country. It belongs to the country. It is not BJP or RSS office,' says HD Deve Gowda JD(S) supremo and former PM. — ANI (@ANI) May 25, 2023
गृहमंत्री अमित शाहांचं काँग्रेसवर टीकास्र
नव्या संसद भवनाच्या उदघाटनावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. यावरून गृहमंत्री अमित शाहांनी टीका केली आहे. “पंतप्रधान मोदींच्या हस्ते 28 मे रोजी नव्या संसदेच्या इमारतीचं उदघाटन होणार आहे. पण, राष्ट्रपतींनी उदघाटन करावे, असं सांगत काँग्रेस बहिष्कार टाकून राजकारण करत आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षातील राज्यांमध्ये विधानसभा इमारतींची पायाभरणी राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री किंवा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी केली होती,” असं अमित शाह म्हणाले.
राहुल गांधींनी मोदी सरकारवर साधला निशाणा : राष्ट्रपतींना निमंत्रण न देण्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. “संसदेची उभारणी अहंकाराच्या विटांनी नव्हे, तर घटनात्मक मुल्यांनी होते. नव्या संसद भवनाच्या उदघाटनाचे निमंत्रण राष्ट्रपतींना न देण्याची भूमिका हा त्यांचा अवमान आहे,” असं राहुल गांधींनी म्हटलं.

New Parliament Building Countrys Property Will Attend Inauguration Say Jds Supremo Deve Gowda

New Parliament Building

संसद भवनाच्या उदघाटनाला उपस्थित राहणार
ही इमारत भाजपा किंवा आरएसएसचे…, एच. डी. देवगौडा यांची प्रतिक्रिया

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm