बेळगाव शहर आणि तालुक्यात मद्य विक्री बंद

belgavkar.com | belgaum | belgavkar

शिवजयंती चित्ररथ मिरवणूक


बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी खबरदारी म्हणून शहर आणि तालुक्यात मद्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. शनिवार (27 मे सकाळी सहा वाजल्यापासून ते रविवार सकाळी सहा वाजेपर्यंत शहर व तालुक्यातील सर्व प्रकारची मद्य विक्री दुकाने, त्याचबरोबर एपीएमसी येथील केएसबीसीएल डेपो देखील बंद राहणार आहे, असा आदेश पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त न्याय दंडाधिकारी डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी बजावला आहे.
या आदेशाचे सर्वांनी कटाक्षाने पालन करावे, उल्लंघन केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.