18-20-may-be-inducted-into-karnataka-cabinet-this-week-belgaum-202305.jpg | बेळगाव : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार; लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपदाची लॉटरी; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार;
लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपदाची लॉटरी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

मंत्रिपदासाठी लॉबिंग, कोणाची वर्णी लागणार?
दुसर्‍या टप्प्यामध्ये 20 मंत्र्यांचा शपथविधी


बेळगाव : दुसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आल्यानंतरदेखील नूतन मंत्र्यांच्या खातेवाटपाला विलंब होत आहे. दुसर्‍या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मंत्र्यांना खातेवाटप करण्यात येणार आहे.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, कोणाची वर्णी लागणार?
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या नेतृत्वात सरकारमधील उर्वरित 24 मंत्रिपदांसाठी 80 हून अधिक इच्छुक आमदारांनी लॉबिंग सुरू केले आहे. इच्छुकांकडून रोज मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठींवर जोर दिला आहे. सर्व इच्छुक आमदार आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री निवडीनंतर आता मंत्रिपद निवड पक्षाला डोकेदुखीचे कारण बनले आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक व संभाव्य आमदार हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या गटातील आमदार आहेत.
सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असून आज 20 जणांची यादी निश्चित होण्याची शक्यता आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्यासह 20 आमदारांची मंत्रीपदासाठी नावे निश्चित करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11.45 वाजता शपथविधी होणार आहे. यामध्ये लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी, ईश्वर खंद्रे, शिवानंद पाटील, बसवराज रायरेड्डी, शरणबसप्पा दर्शनपुर, डॉ. एच. सी. महादेवप्पा, शिवराज तंगडगी, भैरथी सुरेश, कृष्णा भैरेगौडा, के. व्यंकटेश, एस. एस. मल्लिकार्जुन, रहीम खान, डॉ. अजय सिंग, सी. पट्टरंगशेट्टी, एच. के. पाटील, एम. पी. नरेंद्रस्वामी, एम. सी. सुधाकर, डी. सुधाकर, बी. नागेंद्र किंवा के. एन. राजन्ना, दिनेश गुंडूराव, आर. व्ही. देशपांडे, बी. के. हरिप्रसाद, डॉ. शरणप्रकाश पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.