ncps-full-support-for-kejriwals-stance-sharad-pawars-announcement-202305.jpg | केजरीवालांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा : शरद पवारांची घोषणा | belgaum news | belgavkar बेळगावकर

केजरीवालांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा : शरद पवारांची घोषणा

belgavkar.com | belgaum | belgavkar

देशाची लोकशाही वाचवायची आहे की नाही.


देशात लोकशाहीवर आघात करणे सुरु आहे. ही समस्या फक्त दिल्लीची नाही तर संपुर्ण देशाची आहे. निवडून आलेल्या सरकारचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्या कारणासाठी इथपर्यंत आले आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे. 2015 मध्ये दिल्लीत पहिल्यांदा आम आदमी पक्षाचे सरकार आले तेव्हा केंद्रातील मोदी सरकारने एक अध्यादेश काढून आमचे सर्व अधिकार हिसकावून घेतले. या निर्णयाविरोधात गेली 8 वर्षे आम्ही न्यायालयात लढत होतो.
न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला. पण केंद्र सरकारने पुन्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधातच वटहुकूम काढत दिल्ली सरकारचे सर्व अधिकार काढून घेतले. केंद्राने थेट न्यायालयाचे निर्णयच धुडकावून लावत अध्यादेश काढला. हा अध्यादेश राज्यसभेत भाजप विरोधी पक्षांनी मंजूर करु नये, यासाठी आज केजरीवाल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केजरीवाल सरकारला या जाहीर पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
काय म्हणाले शरद पवार?
आजची पत्रकार परिषद खुप महत्त्वाची पत्रकार परिषद आहे. देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. आज देशात लोकशाहीवर आघात केला जात आहे. दिल्लीसमोर जी समस्या निर्माण झाली आहे. ती एकट्या दिल्लीची आहे असं आम्ही मानत नाही, ती संपुर्ण देशाची समस्या झाली आहे. देशाची लोकशाही वाचवायची आहे की नाही. देशाच्या संसदीय लोकशाहीवरच आघात केला जात आहे. देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकाने राज्य चालवायचे की, काही नियुक्त केलेल्या राज्यपालांनी राज्य सरकारकडे दुर्लक्ष करुन त्यांना यश मिळेल, ही समस्या आज सर्वांसमोर आहे.
''ही वेळ तुम्ही कोणत्या पक्षाचे किंवा विचारधारेचे आहात यावर वाद करण्याचा वेळ नाही, ही वेळ लोकशाही वाचवण्याची वेळ आहे. लोकशाही वाचण्यासाठी जनतेने मतदान करण्याचा अधिकार वाचण्यासाठी अरविंदजी आज इथे आले आहेत, असं मी मानतो. मी आज सांगू इच्छितो की, मी माझा पक्ष, सहकारी आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याचे आम्ही पुर्णपणे समर्थन करु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने तुम्हाला सपोर्ट करेल.''
''गेल्या 56 वर्षापासून पार्लमेंटमध्ये काम करत आहे.या 56 वर्षांत अनेक लोकांशी माझे वैयक्तिक नाते तयार झाले. मी खूप लोकांसोबत आतापर्यंत काम केलं. ही समस्या फक्त दिल्ली किंवा पंजाबची नाही, तर संपुर्ण देशाची आहे. निवडून आलेल्या सरकारला राज्य करण्याचा जो अधिकार जनतेने दिला आहे तो अधिकार वाचवण्याचा प्रश्नही आहे. त्यामुळे दिल्ली सरकार वाचवण्यासाठी आमचा पक्ष तुम्हाला सपोर्ट तर करेलच, पण आम्ही इतर राज्यातही जाऊन या गोष्टी इतरांना सांगू शकतो, त्यांना तुमच्यासोबत येण्याची विंनती करु शकतो. तुमची काही जबाबदारी आम्हीही घेऊ.'' असंही त्यांनी सांगितलं.