modi-will-become-pm-for-third-time-with-300-seats-in-2024-amit-shah-in-assam-rally-202305.jpg | मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, यंदा 300 पार जाऊ; | belgaum news | belgavkar बेळगावकर

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, यंदा 300 पार जाऊ;

belgavkar.com | belgaum | belgavkar

अमित शहांनी व्यक्त केला विश्वास


येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. तसेच भाजप 300 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. आसाममधील सभेमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. शहा म्हणाले, 2024 मध्ये 300 जागांसह नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. आसाममध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. यापूर्वी देखील आसाममध्येच भाजपच्या दिब्रूगढ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात त्यांनी याचा पहिल्यांदा उच्चार केला होता. लोकसभेला आसाममधून भाजप 12 ते 14 जागा जिंकतील असा दावाही त्यांनी केला होता.
ईशान्य भारतातील 8 राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आहे. यामुळेच ईशान्येचा विकास झाला असल्याचंही ते म्हणाले होते. एकेकाळी ईशान्य भारत हा काँग्रेसचा गड मानला जात होता. राहुल गांधींनी नुकतीच भारत जोडो यात्रा केली. त्यानंतर ईशान्य भारतात निवडणुका आल्या, त्यानंतर काँग्रेसचा इथून सुपडा साफ झाला. आता काँग्रेस कुठेही दिसत नाही. राहुल गांधी परदेशात जातात तिथं जाऊन देशावर टीका करतात, अशा शब्दांत शहांनी राहुल गांधींवर टीकाही केली होती.
दरम्यान, नुकत्याच कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला दारुण पराभव झाला तर काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळत घवघवीत यश मिळवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याठिकाणी 22 सभा घेतल्या होत्या तसेच अमित शहा यांच्यासह इतरही अनेक भाजप नेत्यांनी इथं सभा घेतल्या. पण तरीही भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळं दक्षिण भारतातलं एकमेव राज्यही भाजपनं गमावलं.