13-year-old-girl-kills-sister-with-help-of-boyfriend-burns-face-says-bihar-police-202305.jpg | असेही धक्कादायक प्रकरण...! 13 वर्षीय मुलीला बॉयफ्रेंडसोबत लहान बहिणीने पाहिलं, आई-बाबांना सांगेल म्हणून... | belgaum news | belgavkar बेळगावकर

असेही धक्कादायक प्रकरण...!
13 वर्षीय मुलीला बॉयफ्रेंडसोबत लहान बहिणीने पाहिलं, आई-बाबांना सांगेल म्हणून...

belgavkar.com | belgaum | belgavkar

जेव्हा ते घरी परतले, मुलगी गायब होती


बिहारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वजण हादरले आहेत. बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील 13 वर्षीय मुलीने आपल्या प्रियकर आणि काकुच्या मदतीने लहान बहिणीची हत्या केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ओळख लपवण्यासाठी मुलीचा चेहरा देखील अ‍ॅसिडने जाळला. तसेच बोट देखील कापले, बिहार पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलीसह तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 13 वर्षीय मुलीची रवानगी जिल्ह्यातील बालिका सुधारगृहात करण्यात आली आहे, तर तिचा 18 वर्षीय प्रियकर आणि काकू न्यायालयीन कोठडीत आहेत.
पोलीस अधीक्षक रवी रंजन कुमार म्हणाले, 15 मे रोजी ही घटना हरप्रसाद गावात घडली आहे. यावेळी मुलींचे आई-वडील लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. जेव्हा ते घरी परतले. 9 वर्षाची मुलगी गायब होती. त्यामुळे पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन केली होती. त्यानंतर 19 मे रोजी घरामागे एका शेतात 9 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. यावेळी हत्येचा सुगावा लागला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले होते. चौकशीदरम्यान, मुलगी आणि तिच्या प्रियकराने गुन्ह्याची कबुली दिली. दोघांनी पोलिसांना सांगितले की 9 वर्षांच्या मुलीने त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यामुळे त्यांनी तिची हत्या केली. लहान बहीण त्यांचे नाते त्यांच्या पालकांसमोर उघड करेल अशी भिती त्यांना होती. आरोपींनी लहान बहिणीची हत्या करुन तिचा मृतदेह घराच्या आत एका बॉक्समध्ये लपवून ठेवला, परंतु तीन दिवसांनंतर जेव्हा मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा त्यांनी मृतदेह जवळच्या शेतात फेकून दिला. त्यानंतर ओळख लपवण्यासाठी त्या चिमुरडीचा चेहरा अ‍ॅसिडने जाळला आणि तिची बोटही कापली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.