सोसायटीच्या पार्किंगमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. सोसायटीत घरगुती कामानिमित्त येणाऱ्या कामगार महिलेची ही मुलगी होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, एक कामगार महिला कामानिमित्त सोसायटीत आली होती. आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला तीनं सोबत आणलं होतं. मुलीला पार्किंग लॉटमध्ये झोपवून ती काम करत होती. त्याचवेळी सोसायटीतल्या व्यक्तीनं बाहेरुन आल्यानंतर कार पार्क केली, पण त्याचवेळी पार्किंगमध्ये झोपलेल्या मुलीच्या अंगावरुन त्यानं थेट कार नेली. यामुळं या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.