naveen-ul-haq-trolled-on-social-media-after-lsg-loss-rcb-202305.jpeg | गोड, गोड आंबे...! लखनौच्या पराभवानंतर नवीन-उल-हक ट्रोल; | belgaum news | belgavkar बेळगावकर

गोड, गोड आंबे...!
लखनौच्या पराभवानंतर नवीन-उल-हक ट्रोल;

belgavkar.com | belgaum | belgavkar

आरसीबीच्या चाहत्यांना मुंबईची साथ


आयपीएल (IPL 2023) मधील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) विरोधातील पराभवानंतर लखनौचा (LSG) गोलंदाज पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात (IPL 2023) विराट कोहली (Virat Kohli) सोबतच्या बाचाबाचीमुळे अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक चर्चेत आला. आता आयपीएल 2023 मध्ये लखनौ संघ नॉकआऊट झाल्यानंतर कोहलीच्या चाहत्यांनी नवीनवर निशाणा साधला आहे. इतकंच नाही तर, आरसीबीच्या चाहत्यांना मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचीही साथ मिळताना दिसत आहे. कोहली आणि नवीन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आयपीएल 2023 मधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु बाहेर गेल्यावर नवीन-उल-हकने कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्याने आरसीबीच्या पराभवानंतर 'गोड आंबे...' अशी स्टोरी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती.
naveen-ul-haq-trolled-on-social-media-after-lsg-loss-rcb-202305_1.jpeg | गोड, गोड आंबे...! लखनौच्या पराभवानंतर नवीन-उल-हक ट्रोल; | belgaum news | belgavkar बेळगावकर
नवीनने कोहलीला डिवचण्यासाठी सोशल मीडियावर अनेक स्टोरी आणि पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर आता लखनौही आयपीएल 2023 मधून बाहेर गेल्यावर आरसीबीचे चाहते नवीनला ट्रोल करताना दिसत आहे. इतकंच नाही तर, फूड डिलिव्हरी ॲप स्विगी आणि झोमॅटो यांनीही याबाबत मजेदार ट्वीट केलं आहे.
कोहली आणि नवीन यांच्यात वाद
आयपीएल 2023 मध्ये आरसीबी आणि लखनौ सामन्यादरम्यान कोहली आणि नवीन यांच्यात वाद झाला, यामध्ये गौतम गंभीरनं उडी घेतली. यानंतर विराट कोहली आणि नवीन-उल-हकसह लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर जुंपली पाहायला मिळाली. कोहली आणि गंभीर यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे. या घटनेनंतर हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. तर नवीनही मागे हटण्याचं नाव घेताना दिसत नाही. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून कोहलीवर निशाणा साधताना दिसतो.