tv-actor-aditya-singh-rajput-who-worked-in-cid-found-dead-in-his-bathroom-202305.jpeg | CID मालिकेत काम करणाऱ्या 'या' अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

CID मालिकेत काम करणाऱ्या 'या' अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

घरातील बाथरुममध्ये मिळाला मृतदेह


मनोरंजन क्षेत्राला धक्का पोहोचवणारी एक बातमी समोर आली आहे. काही टीव्ही मालिका, सिनेमा आणि जाहिरातीत दिसलेला अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूत याचं निधन झालं आहे. समोर आलेल्या बातमीनुसार घराच्या बाथरुममध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं गेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आदित्य सिंग राजपूत केवळ 32 वर्षांचा होता आणि त्यानं आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली होती. आता तो या जगात राहिलेला नाही. तो मुंबईत अंधेरीमध्ये राहत होता. राहत्या इमारतीत 11 व्या मजल्यावर तो राहत होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार आदित्यच्या दोन मित्रांना त्याचा मृतदेह बाथरुममध्ये मिळाला. त्यानंतर त्या दोघांनी वॉचमेनला मदतीला बोलावलं आणि आदित्यला तातडीनं रुग्णालयात नेलं. पण आदित्यने तोपर्यंत या जगाचा निरोप घेतला होता. आदित्यच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही पण रिपोर्टमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार बोललं जात आहे की त्याचा मृत्यू हा ड्रग्सचं सेवन अधिक केल्यानं झाला आहे. आदित्याविषयी सांगायचं झालं तर त्यानं निव्वळ 17 व्या वर्षी आपलं करिअर सुरू केलं होतं. त्यानं मॉडेल म्हणून आपलं करिअर चांगलंच गाजवलं आणि त्यानंतर तो टीव्ही मालिका आणि सिनेमांकडे वळला होता. आदित्य टीव्हीवरची प्रसिद्ध मालिका 'सीआयडी'च्या काही भागांमध्ये नजरेस पडला होता. त्यानं रिअ‍ॅलिटी शो 'स्प्लिट्सव्हिला' मध्ये देखील भाग घेतला होता.
याव्यतिरिक्त त्यानं 'मैने गांधी को नहीं मारा', 'क्रांतीवीर', 'यू,मी और हम' सारख्या सिनेमात काम केलं होतं. अभिनयाव्यतिरिक्त त्यानं अनेक ब्रान्ड्ससाठी कास्टिंग कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं होतं. आदित्य सोशल मीडियावर भलताच सक्रिय होता. इन्स्टाग्रामवर त्याचे 5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो तिथे नेहमी आपले फोटो, रील, व्हिडीओ शेअर करायचा.