royal-challengers-bangalore-fans-abused-gills-sister-shahneel-gill-on-social-media-after-202305.jpeg | RCB च्या पराभवानंतर 'शतकवीर' शुबमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ; | belgaum news | belgavkar बेळगावकर

RCB च्या पराभवानंतर 'शतकवीर' शुबमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ;

belgavkar.com | belgaum | belgavkar

RCB vs GT : IPL 2023

शुबमन गिलच्या बहिणीला सोशल मीडियावर शिवीगाळ


RCB vs GT IPL 2023 : शुबमन गिलने आयपीएलमध्ये (IPL 2023) आपले दुसरे शतक झळकावून विराट आर्मीला बाहेरचा रस्ता दाखवला. गुजरात टायटन्सने 199 धावांचे तगडे आव्हान 19.1 षटकांतच गाठले अन् 5 चेंडू आणि 6 गडी राखून विजय साकारला. विराट कोहली आणि शुबमन गिल या दोन्ही भारतीय शिलेदारांनी शतक ठोकून सामना अविस्मरनीय केला. पण गिलच्या शतकामुळे मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली, तर आरसीबीचे आव्हान संपुष्टात आले. आरसीबीच्या पराभवानंतर शुबमन गिलच्या बहिणीला सोशल मीडियावर शिवीगाळ केली जात आहे. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी शुबमनची बहिण शहनील गिलसाठी अपशब्द वापरले, ज्याची चर्चा होत आहे. यावर गिलचे चाहते आणि क्रिकेटप्रेमी देखील प्रत्युत्तर देऊन टीकाकारांना सुनावत आहेत. खरं तर गुजरात टायटन्सच्या विजयानंतर गिलच्या बहिणीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, या पोस्टवर चाहते आक्षेपार्ह कमेंट करत आहेत.
विराट कोहलीच्या शतकावर शुबमन गिलचे शतक भारी पडल्याचे दिसले. आपल्या संघाच्या पराभवानंतर आरसीबीच्या काही चाहत्यांनी गिलच्या बहिणीवर निशाणा साधला. लक्षणीय बाब म्हणजे शहनील गिलने काही दिवसांपूर्वी गुजरात विरूद्ध लखनौच्या सामन्यातील फोटो पोस्ट केले होते. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहले होते, 'काय अप्रतिम दिवस होता.' काही चाहते याच पोस्टवर शुबमन आणि त्याच्या बहिणीवर आक्षेपार्ह कमेंट करत आहेत. 
गिलच्या शतकामुळे मुंबईची प्लेऑफमध्ये धडक गुजरातविरूद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 'करा किंवा मरा' असा होता. गतविजेत्यांना पराभूत करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचे आव्हान विराट आर्मीसमोर होते. पण गुजरातने आपला विजयरथ कायम ठेवून आरसीबीला बाहेरचा रस्ता दाखवला अन् मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. आरसीबीने दिलेल्या 199 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने 104 धावांची नाबाद शतकी खेळी करून गुजरातला विजय मिळवून दिला.