बेळगाव : बेळगुंदी-राकसकोप रोडवर अपघात, 61 लाखांची भरपाई देण्याचे आदेश

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव : मोटार वाहन अपघातात वैद्यकीय उपचार दरम्यान मृत्यू प्रकरणात 61 लाख 50 हजारांची भरपाई देण्याचे आदेश चौथे जिल्हा व सत्र न्यायालयात बजाविला आहे. याबाबत माहिती अशी की, मयत भाऊराव नारायण कंग्राळकर (रा. राकसकोप) हे बेळगुंदीतील काम संपवून राकसकोपला 7 डिसेंबर 2021 रोजी रात्री 8 च्या सुमारास जात होते. बेळगुंदी ते राकसकोप रोडवरील सोनोलीतील केंबाली नाल्याजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या वाहनाची जोरात धडक बसली. यामुळे कंग्राळकर गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याला प्रतिसाद दिला नाही. यामुळे 9 डिसेंबर 2021 रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. यासंदर्भात बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अतिवेग आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघात झाल्याचा उल्लेख आहे. तसेच विमाकंपनीला प्रतिवादी केले होते. याबाबत जिल्हा न्यायालयात भरपाई दावा दाखल होता. साक्षीपुरावा व दाखल्यांची पडताळणी केली. त्यात मयताच्या वारसदाराला 61 लाख 50 हजार रुपये व्याजासह भरपाईचे आदेश दिले आहेत. श्री कंग्राळकर कुटुंबातर्फे ॲड. सुधीर चव्हाण यांनी काम पाहिले.