total-3-vehicles-cars-caught-fire-herwadkar-high-school-at-2nd-railway-gate-tilakwadi-belgaum-बेळगाव-belgavkar-belgaum-202305.jpg | बेळगाव : हेरवाडकर हायस्कूलसमोर 3 चारचाकी गाड्या आगीत जळाल्या | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : हेरवाडकर हायस्कूलसमोर 3 चारचाकी गाड्या आगीत जळाल्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

तीनही वाहने आगीत जळून मोठे नुकसान


बेळगाव : दुसरे रेल्वे गेट टिळकवाडी येथील हेरवाडकर हायस्कूलसमोर एका मारुती व्हॅनसह दोन कार गाड्या अशा एकूण 3 वाहनांना अचानक आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हेरवाडकर हायस्कूल समोर रस्त्यापलीकडे असलेल्या बॉम्बे गॅरेज शेजारी एका मारुती व्हॅनसह दोन कार गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. बऱ्याच दिवसांपासून पार्क करून ठेवण्यात आलेल्या या गाड्यांना आज शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली.
आगीचे माहिती मिळताचं अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत तीनही वाहने आगीत जळून मोठे नुकसान झाले होते. सदर आग नेमकी कशामुळे लागली याचे निश्चित कारण कळू शकले नाही.