VIDEO : मोबाइल चोरीला गेलाय? चिंता करू नका;

VIDEO : मोबाइल चोरीला गेलाय?
चिंता करू नका;

belgavkar.com | belgaum | belgavkar

केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘या’ पोर्टलच्या मदतीने करता येणार ट्रॅक

ही सिस्टीम नक्की काय आहे आणि कशी काम करते?

देशामध्ये प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करतो. अनेक कंपन्या नवीन फीचर्स असलेले मोबाईल फोन लॉन्च करत असतात. प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार मोबाईल फोन खरेदी करतो. मात्र जर का तुम्ही खरेदी केलेला स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तर? आपण अशा घटना रोज बघतो ज्यामध्ये मोबाईल फोन चोरीला जातात किंवा हरवतात. मात्र आता तुमचा फोन चोरीला गेल्यास किंवा हरवला असल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही आहे. कारण केंद्र सरकारने अशा घटनांमध्ये मोबाईल शोध लागावा म्हणून एक नवीन सिस्टीम लॉन्च केली आहे. तर ही सिस्टीम नक्की काय आहे आणि कशी काम करते हे जाणून घेऊयात.
केंद्र सरकारने संचार साठी नावाचे एक विशेष पोर्टल लॉन्च केले आहे. केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘संचार साथी’ नावाचे पोर्टल लॉन्च केले. पोर्टल लॉन्च करण्यामागे मोबाईल कनेक्शन आणि टेलिकम्युनिकेशनशी संबंधित विविध सुधारणा आणि सेवा प्रदान करणे हे हा हेतू आहे. https : //sancharsaathi.gov.in वर नवीन सेवेचा वापर करता येणार आहे.
या पोर्टलच्या शुभारंभावेळी मंत्र्यांनी सांगितले, या पोर्टलच्या माध्यमातून तीन गोष्टी केल्या जातील. हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ब्लॉक करणे हे पहिले काम या पोर्ट्लच्या माध्यमातून केले जाणार आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) सुरू करण्यात आले आहे. हे देशात कुठेही हरवलेले किंवा चोरीला गेलेले फोन ट्रॅक करणे आणि ब्लॉक करण्यासाठी सक्षम असणार आहे. संचारसाथी पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईल कनेक्शनची चौकशी करू शकता. हे दुसरे काम या माध्यमातून करता येणार आहे. ही सुविधा Know Your Mobile (KYM) आहे. हे वापरकर्त्यांना त्यांचा मोबाइल नंबर वापरून लॉग इन करण्यास आणि त्यांच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन्स आहेत याची आकडेवारी तपासण्यासाठी मदत करणार आहे. जे सहज ब्लॉकसुद्धा करता येणार आहेत.

संचार साथी या पोर्टलच्या माध्यमातून होणारे तिसरे काम हे लिकॉम सिम ग्राहक व्हेरीफिकेशनचे होणार आहे. यासाठी AI अँड फेशियल रिकग्निशन (ASTR) पॉवर्ड सोल्युशन लॉन्च करण्यात आले आहे. हे एक AI वर आधारित टेक्नॉलॉजी मोबाईल कनेक्शनची सुविधा प्रदान करते. तसेच यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सी आणि मालक यांना IMEI-आधारित फोन चोरी सूचना संदेश यासारख्या फीचर्सचा समावेश होतो. याशिवाय, मोबाईल फोन खरेदी करताना तोच IMEI नंबर पूर्वी वापरला गेला असल्यास, सिस्टम वापरकर्त्यांना सूचित करते.
फसवणुकीला बसणार आळा
या लॉन्च करण्यात आलेल्या पोर्टलमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फसवणुकीची प्रकरणे ओळखण्यासाठी AI ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दूरसंचार विभाग (DoT) आणि परम सिद्धी सुपर कॉम्प्युटरने विकसित केलेल्या AI-शक्तीवर चालणाऱ्या साधनांचा वापर करून, प्रणालीने 87 दशलक्ष मोबाइल कनेक्शनचे विश्लेषण केले आहे तसेच 40 लाख संशयास्पद मोबाईल नंबर ओळखण्यात आले आहेत. तर 36 लाख मोबाईल नंबर निष्क्रिय करण्यात आले आहेत. तसेच 40 लाख संशयास्पद मोबाईल नंबर ओळखण्यात आले आहेत. तर 36 लाख मोबाईल नंबर निष्क्रिय करण्यात आले आहेत.

central government minister ashwini vaishanv launch ai sanchar sathi portal

ai sanchar sathi portal find lost smartphones

VIDEO : मोबाइल चोरीला गेलाय? चिंता करू नका;
केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘या’ पोर्टलच्या मदतीने करता येणार ट्रॅक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm