तुमच्या WhatsApp वरही +84, +62, +60 या नंबर्सवरुन कॉल्स येतायत?

तुमच्या WhatsApp वरही +84, +62, +60 या नंबर्सवरुन कॉल्स येतायत?

belgavkar.com | belgaum | belgavkar

वेळीच सावध व्हा, अन्यथा मोठा गंडा घातला जाईल

आपण अनेक वेगवेगळ्या स्कॅमबाबत (Scam) ऐकतो. जामताडा सीरिज तर आपल्यापैकी बऱ्याचजणांनी पाहिली असेलच. फोन करुन आपला ओटीपी घेत हे चोरटे आपल्या अकाउंटमधले सगळे पैसे एका क्षणात लंपास करतात. पण आता सध्या असाच एक नवा स्कॅम आला आहे. या स्कॅममार्फत नव्या पद्धतीनं लोकांना गंडा घातला जात आहे. काय आहे हा नवा फ्रॉड जाणून घेऊयात... 

जर तुम्हाला +84, +62, +60 आणि अशा इतर क्रमांकांनी सुरू होणार्‍या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल येत असतील, तर असे कॉल घेऊ अजिबात रिसिव्ह करु नका. तसेच, हे नंबर एका क्षणाचीही वाट न पाहता ब्लॉक करा.
घोटाळेबाज नवनवीन घोटाळे करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. आता त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित अनेक स्कॅम यापूर्वीही अनेकदा समोर आले आहेत. मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर अनेक स्कॅमर्सनी लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांचे पैसे चोरण्यासाठी केला आहे. याचं कारण म्हणजे, या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं लोकांपर्यंत पोहोचणं सोपं होतंय. व्हॉट्सअ‍ॅपचे सुमारे दोन अब्ज मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत.
आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन येतायत मिस कॉल्स 
अनेक व्हॉट्सअ‍ॅप युजर्सनी तक्रार केली आहे की, त्यांना मलेशिया, केन्या आणि व्हिएतनाम, इथोपिया यांसारख्या देशातून कॉल्स येत आहेत. परंतु, अद्याप हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की, हे मिस कॉल्स का येत आहेत. परंतु, अनेकांचं म्हणणं आहे की, हा एका नव्या स्कॅमचा पार्ट आहे. काहीजण खास करुन जे नवं सिम कार्ड खरेदी करत आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन स्कॅम कॉल्स वारंवार येत आहेत. 
तुम्हालाही असे स्कॅम कॉल्स येत असतील तर काय कराल? 
जर तुम्हालाही व्हॉट्सअ‍ॅपवर असे स्कॅम कॉल्स येत असतील तर अजिबात घाबरु नका. सर्वात आधी कॉल करणाऱ्याला व्हॉट्सअ‍ॅपवर रिपोर्ट आणि ब्लॉक करा. या नंबरवरुन येणाऱ्या मेसेजवरील कोणतीही लिंक किंवा व्हिडीओ ओपन करु नका. कारण त्या लिंकवर तुमचा डेटा किंवा तुमचे पासवर्ड, पैसे चोरण्याचा कोणत्याही प्रकारचा मॅलवेयर असू शकतो. तुम्हाला गंडा घालण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर काहीतरी करून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. म्हणून, युजर्सना अनोळखी कॉलरपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. 

many whatsapp users getting calls from international phone numbers is it scam

Getting WhatsApp calls from phone numbers starting +84 +62 +60 more?

Government To Examine WhatsApps Breach Of Privacy

तुमच्या WhatsApp वरही +84, +62, +60 या नंबर्सवरुन कॉल्स येतायत?
वेळीच सावध व्हा, अन्यथा मोठा गंडा घातला जाईल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm