रविवारी शिष्टमंडळाने पाटण येथे मंत्रीदेसाई यांची भेट घेतली. त्यावेळी सीमाभागातीलप्रत्येक मतदार संघात एकेकच उमेदवार देण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रचाराला यावे, अशी विनंती केली. त्यावर आपण प्रचारासाठी येण्यास तयार आहे. पण, याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारून घ्यावा लागणार आहे. आपण याबाबत चर्चा करणार असून गुरुवारी निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. शिष्टमंडळात कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, अॅड. एम. जी. पाटील, विनोद आंबेवाडीकर यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील अन्य नेत्यांनाही भेटणार आहे.