ramakant.jpg | बेळगाव : प्रचार कार्यालयाचे उदघाटन; बेळगाव दक्षिण मतदारसंघ आणि महाराष्ट्र एकीकरण समिती | belgaum news | belgavkar बेळगावकर
https://bit.ly/3oEqThP

बेळगाव : प्रचार कार्यालयाचे उदघाटन;
बेळगाव दक्षिण मतदारसंघ आणि महाराष्ट्र एकीकरण समिती

belgavkar.com | belgaum | belgavkar

Karnataka Assembly Election;
Belgaum Dakshin (South) Assembly Constituency


बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उदघाटन सोमवारी सायंकाळी 5 वाजता बॅ. नाथ पै सर्कल ते खासबाग मार्गावरील डबल रोड येथील कै. संभाजीराव पाटील यांच्या इमारतीत होणार आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी व सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. तसेच अन्य पदाधिकारी व आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बेळगाव दक्षिण मतदार संघातील समितीचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.