तालुका म. ए. समितीची बैठक मंगळवारी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती कार्यालय सदाशिवनगर (लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या मागे) येथे आयोजित केली आहे. म. ए. समितीच्यावतीने बेळगाव ग्रामीणसाठी आर. एम. चौगुले यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली आहे. निवडणूक प्रचार तसेच पुढील रणनीती ठरविण्यासाठी मंगळवारच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला सर्व आजी-माजी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत सदस्य, महिला आणि युवा संघटना व इतर सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी कळविले आहे.