karnataka-assembly-election-87-member-selection-committee-for-selection-candidate-belgaum-south-constituency-बेळगाव-belgavkar-belgaum-mes-yamakanmardi-mes-202304.jpg | बेळगाव : यमकनमर्डी मतदारसंघातील समितीचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला; महाराष्ट्र एकीकरण समिती | यमकनमर्डी | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : यमकनमर्डी मतदारसंघातील समितीचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला;
महाराष्ट्र एकीकरण समिती | यमकनमर्डी

belgavkar.com | belgaum | belgavkar

यमकनमर्डी मतदारसंघातून समितीची अधिकृत उमेदवारी मारुती नाईक यांना;
Karnataka Assembly Election 2023


बेळगाव : यमकनमर्डी मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या कॉलेज रोड येथील कार्यालयात ही निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस एम. जी. पाटील, युवा आघाडी चिटणीस मनोहर संताजी, दीपक पावशे, मनोहर पाटील, सुरज कणबरकर, नारायण सांगावकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
यावेळी मारुती तिपण्णा नाईक यांची मुलाखत घेण्यात आली व यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ऍड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते मारुती नाईक यांना पुष्पहार अर्पण करून अर्पण करून त्यांना सदिच्छा देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकिकरण समितीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.