viral-trending-news-a-hyderabad-man-spent-rs-6-lakh-on-idlis-swiggi-report-202304.jpeg | अबब....! एका व्यक्तीने वर्षभरात चक्क 6 लाखांची इडली खाल्ली | belgaum news | belgavkar बेळगावकर
One Customer Ordered Idlis Worth Rs 6 Lakh In A Year

अबब....!

एका व्यक्तीने वर्षभरात चक्क 6 लाखांची इडली खाल्ली

belgavkar.com | belgaum | belgavkar

इडलीला हेल्दी फुड म्हणूनही पसंती आहे


इडली हा पदार्थ साऊथ इंडीअन असला तरी देशभरात प्रचंड प्रसिद्ध आहे. देशभरात अनेक इडली लव्हर्स असतील ज्यांना दररोज इडली खायला आवडतं, पण सध्या एका आगळ्या वेगळ्या इडली लव्हरची चांगलीच चर्चा सुरू आहे. या इडली लव्हरने चक्क वर्षभरात 6 लाखांची इडली खाल्ली आहे. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे पण हे खरंय. स्वीगीने यासंदर्भात माहिती दिली.
स्वीगीने दिलेल्या माहितीनुसार एका हैद्राबादच्या व्यक्तीने गेल्या 12 महिन्यांत या स्वीगी अॅपवरुन 6 लाख रुपयांची इडली ऑर्डर केली होती. विशेष म्हणजे हा आकडा मोठा असून फक्त या अॅपवरुन सहा लाखांची इडली ऑर्डर केली आणि याशिवाय अन्य ठिकाणी त्याने जर इडली खाल्ली असेल तर कदाचित सहा लाखांचा आकडा आणखी जास्त वाढू शकतो.
दरवर्षी जागतिक इडली दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून स्वीगीने वर्षभराचा अहवाल सादर केलाय. त्यात ही माहिती दिली. या व्यक्तीने सहा लाख रुपयात तब्बल 8,428 प्लेट इडली मागवल्या होत्या. इडली हे अत्यंत लोकप्रिय फुड आहे. स्वीगीने दिलेल्या अहवालात असेही म्हटले आहे की गेल्या वर्षभरात बेंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये सर्वाधिक इडल्या मागवल्या. इडलीला हेल्दी फुड म्हणूनही पसंती आहे.