saffron-flag-should-be-raised-with-honor-in-front-of-the-belgaum-municipal-corporation-belgaum-बेळगाव-belgavkar-belgaum-202303.jpg | बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर सन्मानाने भगवा ध्वज उभारण्यात यावा | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर सन्मानाने भगवा ध्वज उभारण्यात यावा

belgavkar.com | belgaum | belgavkar

सभागृहात भगव्या ध्वजाबाबत याआधीच ठराव झाला आहे


बेळगाव : बेळगाव : महापालिकेसमोर सन्मानाने भगवा ध्वज उभारण्यात यावा. सभागृहात भगव्या ध्वजाबाबत याआधीच ठराव झाला आहे. त्याचे पालन करण्यात यावी, अशी विनंती म. ए. युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी महापौर, उपमहापौरांकडे निवेदनाव्दारे केली. महापालिका सभागृहात एकमताने ठराव करून इमारतीवर भगवा ध्वज उभारण्यात आला होता. त्यानंतर तो हलवता आला नसल्यामुळे प्रशासन आणि सरकारने नवी इमारत उभारली. त्याठिकाणीभगव्या ध्वजाला स्थान देण्यात आले नाही.
पण, काहींनी पोलिस प्रशासनाला हाताशी धरून बेकायदा लाल-पिवळा उभारला आहे. त्या बेकायदा ध्वजाबाबत अनेकदा मोर्चे काढण्यात आले, निवेदने देण्यात आली. त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता महापालिकेने केलेल्या ठरावाचा अभ्यास करून उभारण्यात आलेला लाल-पिवळा ध्वज हटवावा, अशी मागणी करण्यात आली. उपमहापौर रेश्मा पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मनोहर हुंदरे, नारायण मुचंडीकर, वासू सामजी उपस्थित होते.