बेळगाव : बेळगुंदी येथे शेतकरी मेळावा

बेळगाव : बेळगुंदी येथे शेतकरी मेळावा

belgavkar.com | belgaum | belgavkar

रिंगरोडचा प्रस्ताव, हलगा-मच्छे बायपास, बेळगाव-धारवाड रेल्वे भूसंपादन

बेळगाव : रिंगरोडसह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी बेळगुंदी येथे शुक्रवारी (दि. 24 मार्च) सकाळी 11 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका म. ए. समितीने या मेळाव्याचे आयोजन केले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
बेळगाव तालुक्यातील 31 गावांतून रिंगरोडचा प्रस्ताव आहे. या रिंगरोडमध्ये 1272 एकर सुपीक जमीन जाणार आहे. त्यामुळे तालुका म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवले घेतले असून आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग रोको, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, बेळगुंदी, मुतगा, नंदिहळ्ळी आदी ठिकाणी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी असून प्रांताधिकान्यांसमोर सुनावणीही झाली आहे. तरीही रिंगरोडचा प्रस्ताव रद्द होत नाही.
याशिवाय हलगा-मच्छे बायपास, बेळगाव-धारवाड रेल्वे वाहिनीसाठी भूसंपादन आदी समस्यांविरोधात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता शिवाजीनगर येथे मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत.

organization of farmers meet at belgundi to discuss various problems of farmers including ring road belgaum

belgaum बेळगाव belgavkar farmers meet belgundi farmers ring road bypass belgaum

बेळगाव : बेळगुंदी येथे शेतकरी मेळावा
रिंगरोडचा प्रस्ताव, हलगा-मच्छे बायपास, बेळगाव-धारवाड रेल्वे भूसंपादन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm